AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकात भाजपला मनसेची टाळी, तरी सांगलीच्या अनुभवावरुन भाजपची चांगलीच खबरदारी

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे. (Nashik Standing Committee BJP MNS)

नाशकात भाजपला मनसेची टाळी, तरी सांगलीच्या अनुभवावरुन भाजपची चांगलीच खबरदारी
मनसे, भाजप
| Updated on: Feb 25, 2021 | 10:15 AM
Share

नाशिक : नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे. (Nashik Municipal Corporation Standing Committee Chairman Election BJP MNS unites)

भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजप खबरदारी घेताना दिसत आहे. स्थायी समितीचे भाजपचे 8 सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.

तौलनिक संख्याबळाच्या आधारे स्थायी सदस्य

नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर मनसेचा 1 सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला, तर शिवसेनेला एका जागेची लॉटरी लागली.

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

नाशिक महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र नाशिक रोड प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचं संख्याबळही घटलं होतं.

महापौरांच्या निर्णयानंतर शिवसेना हायकोर्टात

तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात होता. त्यातच महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 ला, मात्र सर्वपक्षीयांच्या तयारीला आतापासून सुरुवात

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आणखी एक वर्षाहून अधिक काळ निवडणुकीसाठी शिल्लक आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आतापासूनच जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी यांच्याही बैठकांवर बैठका सुरु आहेत. (Nashik Municipal Corporation Standing Committee Chairman Election BJP MNS unites)

सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची पाच मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

संबंधित बातम्या :

नाशकात सत्ताधारी भाजपला हायकोर्टाचा दणका, ‘स्थायी’त शिवसेनेच्या संख्याबळात वाढ

नाशिक स्थायी समितीची निवडणूक रंगतदार, सदस्यांची नव्याने नियुक्ती, मनसे किंगमेकर

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली

(Nashik Municipal Corporation Standing Committee Chairman Election BJP MNS unites)

Follow Us
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....