AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटाबंदीनंतर अमित शाह आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत काळा पैसा आला : सिद्धू

पुणे : माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुण्यात येऊन विविध विषयांवर फटकेबाजी केली. सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन त्यांनी सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्यात. या संस्था सरकारच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर नोटाबंदीनंतर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि ग्रामविकासमंत्री पंकजा […]

नोटाबंदीनंतर अमित शाह आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत काळा पैसा आला : सिद्धू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

पुणे : माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुण्यात येऊन विविध विषयांवर फटकेबाजी केली. सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन त्यांनी सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्यात. या संस्था सरकारच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर नोटाबंदीनंतर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकात काळा पैसा आल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यात भारती अभिमत विद्यापीठात पत्रकार परिषदेत सिद्धू बोलत होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी नोटाबंदीवरुन भाजपला लक्ष्य केलं. नोटाबंदीने हजारो लोक बेरोजगार झालेत. देशाची अर्थव्यवस्था ही रोखीवर अवलंबून आहे. 93 टक्के नागरिक कॅशचा व्यवहार करतात. मात्र कॅशलेस हा तुघलकी निर्णय घेतल्याचा आरोप सिद्धू यांनी केला.

“भाजप नेत्यांच्या बँकेत काळा पैसा”

सरकार काळा पैसा हा देशात लपवून ठेवल्याचं म्हणत होतं. मात्र काळा पैसा हा परदेशात सोनं, स्थावर मालमत्तामध्ये असून हा पैसा देशात आला नसल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. ज्येष्ठ विधिज्ञ जेठमलानी यांचे स्वीस बँकेत करोडो रुपये असल्याचं सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. 1400 नागरिकांचा पैसा स्वीस बँकेत असून हा पैसा आला का, असा सवाल सिद्धू यांनी केलाय.

नोटाबंदी नंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी पाच दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंतीभाई आणि पंकजा मुंडे यांच्या बँकांत पैसा जमा झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केलाय.

“पश्चिम बंगालमध्ये ठोकशाही”

पश्चिम बंगालमधील सरकार आणि सीबीआय वादावर बोलताना सिद्धू यांनी सीबीआय कठपुतळी बनल्याचा आरोप केलाय. सरकार खरं दाबून टाकत आहे. मात्र खरं दबणार नाही. सरकारने लोकशाहीला ठोकशाही, गुंडातंत्र बनवलंय. तर देशद्रोही बनवून काहींना तुरुंगात टाकलं, तर काहींवर गोळ्या झाडल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. देशातील  संस्थाना राहू, केतूचं ग्रहण लागलंय. मात्र यामुळे विरोधी पक्षांना एकत्र येण्यास मदत होईल. सरकार मनगटशाही करत असून अहंकार आलाय, मात्र विनाश होणार असल्याचा दावा सिद्धू यांनी केला.

“अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा”

यावेळी सिद्धू यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीका केली. अण्णा हजारे यांना काही घ्यायचं नाही, तर अण्णा विचारधारा देणारे व्यक्तिमत्व आहे. अनेकांना मुख्यमंत्री बनवलं असून मी अण्णाचा आदर करत आहे. अण्णा निष्काम सेवक असून अण्णांना याबदल्यात काही नको असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय.

“प्रियांका गांधींमुळे ऊर्जा मिळेल”

प्रियांका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी प्रियंकात असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. प्रियांका गांधी बहार असून सकारात्मक ऊर्जा आहे. प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली असून ती काट्याची वाट आहे. प्रियांका यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधी यांचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

“विराट एक नंबर खेळाडू”

क्रिकेटवर बोलताना त्यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं. क्रिकेट विषय निघाल्यावर मी भावूक होतो. सध्याचा संघ आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट संघ आहे. विराट कोहली हा एक संस्था असून दबावात सर्वोत्तम खेळ करतोय. कसोटी क्रिकेटमधे खरी क्षमता पणाला लागते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत  हरवलं आहे. विराट कोहली एक नंबर क्रिकेटर असून मानसिक फार कणखर असल्याचं म्हणत त्यांनी विराटचं कौतुक केलं.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?