राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…

निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर निर्णय झालेला नाही, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.

राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात...
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 10:38 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावल्या आहेत. हे वृत्त निराधार असल्याचा दावा मलिक यांनी केला. (Nawab Malik Denies Rumors of 12 NCP MLAs joining BJP)

“काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर, उस्मानाबाद – पुन्हा विजयी बबनराव पाचपुते –  श्रीगोंदा, अहमदनगर – पुन्हा विजयी वैभव पिचड –  अकोले, अहमदनगर – पराभूत (आता आमदार नाही)

नमिता मुंदडा – केज, बीड (आधी आमदार नव्हत्या, आता विजयी)

(Nawab Malik Denies Rumors of 12 NCP MLAs joining BJP)

नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली होती. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

भास्कर जाधव –  गुहागर, रत्नागिरी – पुन्हा विजयी जयदत्त क्षीरसागर – बीड, बीड – पराभूत (आता आमदार नाही) पांडुरंग बरोरा – शहापूर, ठाणे – पराभूत (आता आमदार नाही) दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत (आता आमदार नाही)

रश्मी बागल – करमाळा, सोलापूर – (आधी आमदार नव्हत्या, निवडणुकीतही पराभूत) शेखर गोरे – माण, सातारा – (आधी आमदार नव्हते, निवडणुकीतही पराभूत)

संबंधित बातमी :

शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?

(Nawab Malik Denies Rumors of 12 NCP MLAs joining BJP)

Non Stop LIVE Update
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.