वक्फ बोर्डावर ईडीची छापेमारी नाहीच, बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापेमारी; नवाब मलिक यांचा खुलासा

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरु सल्याचं मलिक यांनी सांगितलं.

वक्फ बोर्डावर ईडीची छापेमारी नाहीच, बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापेमारी; नवाब मलिक यांचा खुलासा
नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 5:19 PM

मुंबई : पुणे आणि अन्य ठिकाणी वक्फ बोर्डावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरु झाल्याची माहिती आहे. ही छापेमारीचा संबंध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी जोडला जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरु सल्याचं मलिक यांनी सांगितलं. (Nawab Malik’s explanation that No action taken by Enforcement Directorate on Waqf Board)

‘वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे, हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. 19 मे, 2005 ला चॅरिटी कमिश्नरकडून वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झाला. डीन रजिस्ट्रेशनने लोकशाही आघाडी सरकार आलं तेव्हा वक्फ अॅक्ट लागू झाला. त्यामुळे चॅरिटी कमिश्नरकडे असलेल्या संस्था त्याचं डीम रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय चॅरिटी कमिश्नरने घेतला. त्यावेळी मी राज्यमंत्री होतो. आम्हीही वक्फ अॅक्ट 1995 आम्ही लागू केला’, असं नवाब मलिक म्हणाले.

‘ईडी घरी आली तर स्वागत करु’

आता जी छापेमारी सुरू आहे. काही चॅनलवाल्यांनी सांगितलं की मलिकच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू. मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे. त्यात पुण्यात एमआयडीसीत 5 हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते. एका बनावट कागदपत्राद्वारे 30 डिसेंबर, 2020 चा दस्ताऐवज वापरून 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. जे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉईंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली. त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली, असंही मलिकांनी सांगितलं.

खुसरो हे ऑगस्टमध्ये पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते. मला चीफ ऑफिसरने फोन केला की तक्रार नोंदवली जात नाही. मी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी एक तासाने खुस्रोंना बोलावून तक्रार नोंदवली. तीन जणांना अटक केल्याचं मलिक म्हणाले.

‘पदाचा चार्ज घेतल्यापासून क्लीनअपचं काम सुरु केलं’

‘मी अल्पसंख्याक पदाचा चार्ज घेतल्यानंतर वक्फ अॅक्ट नुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे. कोणी आमच्याकडे तक्रार केल्यास त्यावर आम्ही चौकशी समिती नेमू शकतो. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली. निवडणुकीद्वारे दोन जणांचे नाव आले होते. त्यातील एकाची नियुक्ती केली गेली. काही जागा भरायच्या आहेत. पण पहिल्यांदाच फुलफेज बोर्ड बनलं आहे’, अशी माहितीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करा, मलिकांचं आव्हान

ईडीचं स्वागत करतो. वक्फ बोर्डाच्या ३० हजार संस्था आहेत. त्यांची चौकशी करावी अशी मी ईडीला विनंती करेन. आमच्या क्लिनअप अभियानात ईडीचं सहकार्य मिळत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. लखनऊ शिया वक्फ बोर्डासाठी तिथल्या शिया कम्युनिटीने पंतप्रधानांना पत्रं लिहिलं होतं. सीबीआयकडे प्रकरण दिलं. वसीम रजाच्याही भानगडी आहेत त्याकडेही लक्ष द्या. आम्हाला तुमचं सहकार्य हवं. ३० हजार प्रकरणं देणार आहोत. गेल्या ३०-३५ दिवसांपासून जे क्लिनअप अभियान सुरू केलं आहे. त्यावरून काहींना वाटत असेल मलिक यांना घाबरवू. तुम्ही सहकार्य देत आहात ही चांगली गोष्ट आहे. कुणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडीचा वापर होत असेल तर विभागच गलतफहमीमध्ये डिपार्टमेंट आहे, असं वाटतं. तुम्ही सहकार्या मागाल तर देऊ. पण आम्ही जी लढाई सुरू केली आहे, चुकीच्या लोकांना आत टाकण्याची लढाई सुरू केली त्यामुळे अशा बातम्या पसरवून मलिकांची प्रतिमा मलिन करता येणार नाही. वक्फ बोर्डात ईडी घुसली म्हणून मलिकांना घाबरवता येणार नाही, असा इशाराही मलिक यांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या :

‘बऱ्याच कामगारांना कामावर येण्याची इच्छा, त्यांना संरक्षण पुरवणार’, अनिल परबांचा दावा

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

Nawab Malik’s explanation that No action taken by Enforcement Directorate on Waqf Board

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.