AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप युतीच्या विचारात पण NCP कडून पालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी

"पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणूत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार. यातून पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांची, नेत्यांची ताकद कळून येते. या निवडणुका तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे"

भाजप युतीच्या विचारात पण NCP कडून पालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी
ncp ajit pawar mla Raju Karemore
| Updated on: May 31, 2025 | 10:39 AM
Share

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी स्वबळावर लढू असं भाजपकडून सांगतिलं जातय. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका आमदाराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच म्हटलं आहेत. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारमोरे यांनी पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरु असल्याची माहिती दिली. “पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणूत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार. यातून पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांची, नेत्यांची ताकद कळून येते. या निवडणुका तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. यातून कार्यकर्ता मोठा होतो, त्याचे गुण दिसतात. म्हणून आपला पक्ष स्वबळावर निवडणूक लढेल, त्या हिशोबाने तयारी सुरु आहे” असं आमदार राजू कारमोरे यांनी सांगितलं.

विदर्भात अमरावती, नागपूर या मोठ्या महापालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, या सर्व ठिकाणी स्वबळावर लढणार का? त्यावर आमदार राजू कारमोरे म्हणाले की, “बूथची बांधणी सुरु आहे. नवीन कार्यकर्ते जोडण्याच काम सुरु आहे. नवीन सदस्य बनवणं सुरु आहे. विदर्भात पक्षाचे सहा आमदार आणि एक मंत्री आहे. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. विधानसभेचे सहा आमदार, विधान परिषदेच्या आमदारांवर जबाबदारी दिली आहे”

पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी स्वबळावर लढू यावर राजू कारमोरे म्हणाले की, “हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा असेल. आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. स्वबळावर लढल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं का ते पक्ष नेतृत्व ठरवेल”

जनतेमध्ये कुठले मुद्दे घेऊन जाणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठले मुद्दे घेऊन उतरणार ते सुद्धा राजू कारमोरे यांनी सांगितलं. “अजितदादा ज्या गतीने काम करतात, सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. करोना संकट काळात वित्त नियोजनातून त्यांनी जे प्लानिंग केलं, त्याने राज्यातील जनतेला दिलासा दिला. त्या हिशोबाने मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणार” असं राजू कारमोरे म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.