AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

125 जागांसाठी 40 स्टार प्रचारक, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी

येत्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी (NCP Star Campaigner for assembly election) जाहीर केली आहे.

125 जागांसाठी 40 स्टार प्रचारक, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी
| Updated on: Oct 05, 2019 | 3:51 PM
Share

नवी दिल्ली : येत्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी (NCP Star Campaigner for assembly election) जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नवाब मलिक यांसह अनेक नेत्यांचा नावाचा समावेश (NCP Star Campaigner for assembly election) आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी (NCP Star Campaigner for assembly election) होणार आहेत.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नेत्यांची नाव आहेत. विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत काल (4 ऑक्टोबर) संपली. यानंतर आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात विविध प्रचारसभांचे (NCP Star Campaigner for assembly election) आयोजन केलं आहे.

दरम्यान यातील अनेक स्टार प्रचारक हे लोकसभा निवडणुकांतील आहेत. यंदाच्या लोकसभेत राष्ट्रवादी 20 जागांवर लढली होती. त्यानंतर आता विधानसभेत राष्ट्रवादीने 288 पैकी 125 जागांवर लढण्याचा निर्णय (NCP Star Campaigner for assembly election) घेतला आहे.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक 

  1. शरद पवार
  2. प्रफुल्ल पटेल
  3. जयंत पाटील
  4. छगन भुजबळ
  5. अजित पवार
  6. दिलीप वळसे पाटील
  7. सुनील तटकरे
  8. सुप्रिया सुळे
  9. धनंजय मुंडे
  10. नवाब मलिक
  11. अरुण गुजराथी
  12. शशिकांत शिंदे
  13. हसन मुश्रीफ
  14. जितेंद्र आव्हाड
  15. अनिल देशमुख
  16. अन्ना डांगे
  17. राजेश टोपे
  18. अमोल कोल्हे
  19. वंदना चव्हाण
  20. माजिद मेमन
  21. अमेल मिटकरी
  22. वर्षा पटेल
  23. प्रकाश गजभिये
  24. किरण पावसकर
  25. सतीश चव्हाण
  26. विक्रम काळे
  27. रामराव वाढकुटे
  28. फौजिया खान
  29. शब्बीर विद्रोही
  30. जयदेव गायकवाड
  31. नरेंद्र वर्मा
  32. रुपाली चाकणकर
  33. मेहबूब शेख
  34. ईश्वर बलबुध्दे
  35. नसीम सिद्दीकी
  36. शेख सुबान अली
  37. अविनाथ दहिगुडे
  38. प्रदीप साळुंखे
  39. सुषमा अंधारे
  40. सक्षना सलगर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे (Maharashtra Assembly election 2019) निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
  • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
  • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
  • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...