Jayant Patil Profile : जयंत पाटील यांची संपूर्ण माहिती

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा महत्त्वाचा चेहरा म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil Profile) होय.

Jayant Patil Profile : जयंत पाटील यांची संपूर्ण माहिती

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा महत्त्वाचा चेहरा म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil Profile) होय. जयंत पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तास्थापनेतील महत्त्वाचा मोहरा आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ तर अजित पवार यांचे विश्वासू, पवार घराण्याशी जवळीकता तर संघटनेत शब्दाला मान, अशी बहुविध भूमिका जयंत पाटील पार पाडतात. (NCP Jayant Patil Profile)

हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते.

इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचं गाव. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1962 रोजी झाला. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले. सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारे मंत्री , अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे.

जयंत पाटील यांची वैयक्तिक माहिती

  • नाव : जयंत राजाराम पाटील
  • जिल्हा : सांगली
  • पक्ष – राष्ट्रवादी
  • वय – 57 वर्षे
  • शिक्षण – बी.ई.सिव्हिल इंजिनिअरिंग
  • संपत्ती – 16 कोटी
  • कुटुंब – पत्नी आणि दोन मुले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI