AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका’, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य

"मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि आपल्या मुंबईचा मान-सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्यासाठी काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं", असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

'मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका', अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य
| Updated on: May 01, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कामांचा उल्लेख केला.  “संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि आपल्या मुंबईचा मान-सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्यासाठी काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई टिकली, मुंबई, मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला, मराठी माणूस एकजूट करून राहिला हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“काही लोकांना फोडण्याचा राजकारण झालं. अशा पद्धतीचा राजकारण करून उद्याच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे योग्य पद्धतीने राहणार आहे का? कायदा काय राहणार? याचाही विचार तुम्ही मी सगळ्यांनी केला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“आपल्या इथं हे सरकार आल्यापासून सांगितलं, कोणत्याही निवडणुकांमध्ये, विधान परिषदेची असेल विधानसभेचे असतील पोट निवडणूक असेल, आता काल झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचे यश मिळवलं आहे. जनता आपल्याबरोबर आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला नाकारता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“माझी आपल्याला विनंती आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सोनिया गांधींनी, शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं होतं, अडचणी अधिक होत्या. तरुणाचं संकट होतं. परंतु त्याच्यावर मात करून आम्ही सगळ्यांनी हे महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम केलं”, असा दावा अजित पवार यांनी केला. \

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

महाराष्ट्रामध्ये आज अवकाळी पाऊस पडतोय. त्याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला. माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे. त्याच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या फळबागा, त्याची उन्हाळी पिक उध्वस्त झालेली आहेत. परंतु त्यांना मदत करण्याची भूमिका हे आताच्या राज्यकर्त्यांची नाही. काय करतात त्यांचं काम नाही का?

हे सरकार काही बोलायला तयार नाहीये आणि म्हणून मित्रांनो एवढ्यावरच नाही तर अजूनही एक ते पाच तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तरी मुंबईतली सभा असली तरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा तुमच्या माझी सगळ्यांची सेवा करतोय. त्याला आधार देण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार आहे.

सरकारला दहा महिने झाले. सरकार निवडणुकांना का घाबरतं? महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाहीत. तुम्ही निवडणुका जाहीर का करत नाहीये? आता तर पावसाळा पण नाहीये. परंतु निव्वळ यांच्या मनामध्ये भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल याच्याबद्दलचा विश्वास शिंदे-फडणवीस सरकारला नाहीये. आज मुंबईसारखं एक महत्त्वाचे शहर काही राज्यांच्या पेक्षा या शहराचं बजेट जास्त आहे, असं असताना देखील तिचा कारभार राज्याच्या प्रमुखांच्या अंडर चाललेला आहे

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.