मुंबई: मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना दिल्याचं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खिल्ली उडवली. मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही इकडे या… या बाजूला. तुम्हाला मुख्यमंत्री करायला अडचण येणार नाही. तुमच्यातील गुण पाहता आमच्यातील कोणीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध करणार नाही, अशी खोचक टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली. विधानसभा सभागृहातच जयंत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने एकच खसखस पिकली. यावेळी पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करत चिमटेही काढले.