विधानसभेसाठी शरद पवारांना नातू रोहित पवारांकडून ‘हे’ तीन पर्याय!

पुणे : काहीही झालं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढणारच, असा निश्चय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुरंदर, कर्जत-जामखेड किंवा हडपसर यापैकी एका मतदारसंघातून आपण लढणार असून, कोणत्या मतदारसंघातून मी लढायंच, हे पक्षश्रेष्ठींनी ठरवावं, असं म्हणत रोहित पवार यांनी थेट शरद पवारांसमोरच […]

विधानसभेसाठी शरद पवारांना नातू रोहित पवारांकडून 'हे' तीन पर्याय!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पुणे : काहीही झालं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढणारच, असा निश्चय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुरंदर, कर्जत-जामखेड किंवा हडपसर यापैकी एका मतदारसंघातून आपण लढणार असून, कोणत्या मतदारसंघातून मी लढायंच, हे पक्षश्रेष्ठींनी ठरवावं, असं म्हणत रोहित पवार यांनी थेट शरद पवारांसमोरच पर्याय ठेवले आहेत. एका खासगी यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत रोहित पवार बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडीत यावं. काँग्रेसनेने देखील मनसेला सोबत घेण्याचा विचार करावा, असेही मत रोहित पवार यांनी मांडले. यावेळी रोहित पवार यांनी घराणेशाहीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “पवारांच्या घरात घराणेशाही कसली? पणजोबांपासून घरात राजकारण आहे, तर मी काय अजून वेगळं करणार आहे?”

एक्झिट पोलवर रोहित पवार काय म्हणाले?

येत्या 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी देशभरातील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. मात्र ”महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या वेगळं चित्र निवडणुकीच्या निकालादिवशी असेल. यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला 23 पेक्षा जास्त जागा मिळतील”, असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

काल (19 मे) देशभरातील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. महाराष्ट्राबाबात बोलायचं झाल्यास शिवसेना-भाजपच्या जागा घटतील असं सर्वच एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. TV9 C voter exit poll नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे.

याबाबत रोहित पवार यांनी एका खासगी युट्यूब वाहिनीशी बोलताना, ”एक्झिट पोलमध्ये धक्कादायक पोल दिसतं असले, तरी हे पोल लोकांच्या मनातले नाहीत, असे मत त्यांनी एक्झिट पोलबाबत व्यक्त केलं. तसेच हे पोल नेमकं कसं घेतले जातात, हे समजून घेणे गरजेचं आहे. त्याशिवाय हे एक्झिट पोल किती खरे आहेत? यावर एकदा लक्ष देणं गरजेचं आहे”.

येत्या निवडणुकीच्या निकालाचे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यावेळी एक्झिट पोलच्या विरुद्ध चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला 23 च्या आसपास जागा मिळतील असा मला विश्वास आहे असही रोहित यांनी म्हटंल.

”तसेच 2004, 2009 आणि 2014 या तिन्ही लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल काय होता हे सर्वांना चांगलंच माहित आहेत. त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेवण्यापेक्षा निवडणुकीच्या निकालावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, असेही रोहित यांनी सांगितले. विशेष म्हणजे एक्झिट पोलनंतर अदानी आणि रिलायन्स ग्रुपचे शेअर्स वाढले कसे? यामागचे राजकारण काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे”.

देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज  Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

TV9-C Voter Exit Poll LIVE : केंद्रात पुन्हा ‘मोदी सरकार’ 

Lok sabha Exit Polls 2019 : सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

Tv9 C voter exit poll :  महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा चौपट वाढणार

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा  

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!  

Tv9-C Voter Exit Poll : देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव  

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.