TV9-C Voter Exit Poll LIVE : केंद्रात पुन्हा ‘मोदी सरकार’
Tv9 – C Voter Exit Poll : देशात कुणाचं सरकार येणार याचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईलच, पण त्यापूर्वी मतदानोत्तर चाचण्या समोर आल्या आहेत. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटर यांनी संयुक्तपणे सत्य आणि तथ्यावर आधारित सर्वेक्षण करुन एक्झिट पोल समोर आणला. या एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल. मात्र, अनेक राज्यात […]

Tv9 – C Voter Exit Poll : देशात कुणाचं सरकार येणार याचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईलच, पण त्यापूर्वी मतदानोत्तर चाचण्या समोर आल्या आहेत. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटर यांनी संयुक्तपणे सत्य आणि तथ्यावर आधारित सर्वेक्षण करुन एक्झिट पोल समोर आणला. या एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल. मात्र, अनेक राज्यात भाजपला काही प्रमाणात फटका बसेल.
‘टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर’ यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे.
देशात पुन्हा ‘मोदी सरकार’
देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
देशात कुणाला किती जागा?
- एनडीए – 287
- यूपीए – 128
- इतर – 127
| पक्ष | जागांचा अंदाज (देश) | मतांची टक्केवारी |
|---|---|---|
| राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) | 287 | 44.10 |
| संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) | 128 | 11.40 |
| इतर | 127 | 28.10 |
| एकूण | 542 |
महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील, असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे. गेल्या म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 22 जागा होत्या यंदा त्यामध्ये 3 जागांची कपात होत आहे. तर शिवसेनेलाही 3 जागांचा फटका बसला आहे. सेनेच्या जागा 18 वरुन 15 वर आल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागा चौपट वाढल्या आहेत. काँग्रेसला केवळ 2 जागा 2014 मध्ये होत्या त्या आता 8 वर पोहोचण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागाही 2 ने वाढण्याचा अंदाज असून, राष्ट्रवादी 4 जागांवरुन 6 जागांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
- भाजप – 19
- शिवसेना – 15
- काँग्रेस – 8
- राष्ट्रवादी – 6
यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी
केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोठी मुसंडी मारणार आहे, असे चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमधून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 40, तर भाजप आणि मित्र पक्षांना 38 जागा मिळतील. तसेच, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल, असे एकंदरीत चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?
- भाजपप्रणित एनडीए – 38 (44.10 टक्के मतं)
- सपा+बसप+रालोद – 40 (41.90 टक्के मतं)
- काँग्रेसप्रणित यूपीए – 2 (11.40 टक्के मतं)
पश्चिम बंगालमध्ये दीदींचाच दबदबा
‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 29, तर भाजपला 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला दोन जागा मिळतील, असेही एक्झिट पोलमध्ये दिसते आहे.
पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा?
- तृणमूल काँग्रेस – 29
- भाजप – 11
- काँग्रेस – 2
मध्य प्रदेशात भाजपला फटका
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली, मात्र तरीही मोदी लाट कायम असल्याचे एकूण चित्र एक्झिट पोलवरुन दिसते आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूम 29 जागा आहेत. TV9-C Voter च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 29 पैकी 24 जागा मिळतील, तर काँग्रेसला 5 जागा मिळतील.
कुणाला किती जागा मिळतील?
- भाजप – 24
- काँग्रेस – 5
सर्व एक्झिट पोलचा अंदाज :
| एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
|---|---|---|---|
| टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
| टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
| एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
| न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
| न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
| न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
| इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
| न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
| रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |
LIVE UPDATE :
- सर्व एक्झिट पोल टीव्ही 9 मराठीवर, सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएला सर्वात जास्त जागा

- गुजरातमध्ये भाजप 22, तर काँग्रेसला केवळ 4 जागा मिळणार

- बिहारमध्ये भाजप-जेडीयू 33 , तर काँग्रेस-आरजेडीला केवळ 7 जागा मिळणार
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची मुसंडी भाजप 11 , काँग्रेस 2, तर तृणमूल काँग्रेसला 29 जागा मिळणार
- उत्तर प्रदेशात सपा-बसपाची जोरदार मुसंडी,
?भाजप – 38?सपा-बसपा – 40?काँग्रेस – 2

- देशात भाजपप्रणित एनडीएला 284, काँग्रेसप्रणित यूपीएला 128, तर इतरांना 127 जागा
-
महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील??भाजप – 19?शिवसेना – 15?काँग्रेस – 8?राष्ट्रवादी -6

- देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव
TV9 भारतवर्ष पर देखते रहिए सबसे सटीक विश्लेषण. @_YogendraYadav ने जताया मोदी सरकार की वापसी का अनुमान. #ExitPoll2019 #TV9CvoterExitPoll pic.twitter.com/lly9PXUQa9
— TV9 भारतवर्ष (@TV9Bharatvarsh) May 19, 2019
- अशी निवडणूक मी कधीच पाहिली नाही, भाजपच्या लोकांनी हिंसा केली – ममता बॅनर्जी
- निकालाआधीच विरोधकांच्या हालचालींना तुफान वेग, चंद्रबाबूंकडून बड्या नेत्यांच्या भेटीगाठी
- 2014 साली काय स्थिती होती?

- पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला कमी जागा मिळतील, असे ममता बॅनर्जींच्या बॉडी लँग्वेजवरुन वाटतंय – ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदानाचा हक्क बजावला

- भाजपला 200 पेक्षा कमी जागा आल्यास, भाजपमधूनच वेगळ्या चेहऱ्यासाठी आवाज येऊ शकतो – ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
- ज्या प्रमाणात इतर राज्यात भाजपच्या जागा कमी होतील, त्या संख्येत पश्चिम बंगाल किंवा ओरिसातून मिळणार नाहीत – ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
- काँग्रेस आणि भाजपपेक्षा इतर प्रादेशिक पक्षांची ताकद अधिक असेल, अशी शक्यता सध्या दिसतेय – ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई
- 2014 साली एनडीएला 336, यूपीएला 60 आणि इतरांना 147 जागा होत्या.
महाराष्ट्रातील 48 जागांबाबत महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे. महाराष्ट्रात कुणाला सर्वाधिक जागा मिळणार, कुठला पक्ष दोन अंकी जागा मिळवणार इत्यादींपासून कुठल्या जागेवर कुणाला विजय मिळणार, याचीही उत्सुकता अनेकांना आहे. तसेच, पश्चिम बंगालसारख्या राज्यात हिंसाचार होत असतानाही सर्वेक्षकांकडून मतदारांनी कुणाला मत दिलंय ते जाणून घेण्यात आलं. हाच अचूक अंदाज 23 तारखेच्या निकालापूर्वी सत्ता कुणाची हे स्पष्ट करणार आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात अशा मोठ्या राज्यांमधील कल कुणाच्या बाजूने आहे, याचेही चित्र एक्झिट पोलमध्ये दिसून येणार आहे.
एक्झिट पोलमध्ये मतदारांनी कुणाला मत दिलंय त्याची आकडेवारी दाखवली जाईल.
तब्बल 4000 विधानसभा मतदारसंघ आणि 5 लाखांहून अधिक मतदार, सर्वात विश्वसनीय, अचूक आणि वेगवान #ExitPoll, पाहा आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून फक्त @TV9Marathi वर@CvoterIndia @YRDeshmukh @RohitVishwakarm #Tv9CVoterExitPoll pic.twitter.com/F5FoxQBkUD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2019
बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपनेच 282 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास भाजपने बोलून दाखवलाय. तर महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत 42 जागा जिंकणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने यावेळी जागा वाढतील असा दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील लढतींसह देशातील निकालाचा अंदाज 19 मे रोजीच पाहता येईल.
