AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 C voter exit poll :  महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा चौपट वाढणार

Tv9 C voter exit poll  मुंबई : टीव्ही 9 सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातील सर्वात विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिलं जातं.  या एग्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील […]

Tv9 C voter exit poll :  महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा चौपट वाढणार
या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपटीने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे.
| Updated on: Jul 05, 2019 | 3:35 PM
Share

Tv9 C voter exit poll  मुंबई : टीव्ही 9 सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातील सर्वात विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिलं जातं.  या एग्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसने यंदा 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढल्या आहेत. त्यांनी मित्रपक्षांना आपआपल्या कोट्यातील 2-2 जागा सोडल्या.  त्यानुसार काँग्रेसला 26 पैकी 8 जागी विजय मिळेल असा अंदाज Tv9 C voter exit poll चा आहे.

राष्ट्रवादीच्या जागांमध्ये 2 जागांची वाढ

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात 4 जागांवर विजय मिळवता आला होता. यंदा Tv9 C voter exit poll च्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये 2 जागांची भर पडेल असा अंदाज आहे.

पक्षजागांचा अंदाज (महाराष्ट्र)
भाजप19
शिवसेना15
काँग्रेस8
राष्ट्रवादी6
एकूण48

Tv9 C voter exit poll महाराष्ट्राचा अंदाज

Tv9 C voter exit poll नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे.  गेल्या म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 22 जागा होत्या यंदा त्यामध्ये 3 जागांची कपात होत आहे. तर शिवसेनेलाही 3 जागांचा फटका बसला आहे. सेनेच्या जागा 18 वरुन 15 वर आल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागा चौपट वाढल्या आहेत. काँग्रेसला केवळ 2 जागा 2014 मध्ये होत्या त्या आता 8 वर पोहोचण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागाही 2 ने वाढण्याचा अंदाज असून, राष्ट्रवादी 4 जागांवरुन 6 जागांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

देशात पुन्हा मोदी सरकार

Tv9 C voter exit poll एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत, पण 100 चा आकडा पार करणं कठीण आहे, असा अंदाज आहे.

Tv9 C voter exit poll एक्झिट पोलनुसार भाजपला एकूण 236 जागा मिळू शकतात. तर  मित्रपक्षांसह एनडीएच्या जागा 287 वर पोहोचतील असा अंदाज आहे.

गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने 282 जागा एकट्याने जिंकल्या होत्या, तर मित्रपक्षांच्या मिळून 336 जागांपर्यंत मजल मारली होती. यंदा मात्र भाजपला जागांचा फटका बसला आहे.

एग्झिट पोलभाजप + काँग्रेस +इतर
टीव्ही 9-सी व्होटर 287128127
टाईम्स नाऊ –VMR306132104
एबीपी-नेल्सन 267127148
न्यूज 24 – टुडेज चाणक्य34070133
न्यूज नेशन282-290111-126130-138
न्यूज 18- IPSOS 33682124
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 287128127
न्यूज एक्स242164136
रिपब्लिक – जन की बात 30512487

संबंधित बातम्या 

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा  

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!  

Tv9-C Voter Exit Poll : देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव  

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.