‘पुरोगामी’ पवारांचा नातू वादग्रस्त फादरच्या दरबारात

दापोडी (पुणे) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सध्याचे सर्वात जास्त चर्चेतले उमेदवार ठरलेत. एक तर त्यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागली, त्यानंतर त्यांचं भाषण फसलं, नंतर ते कुठलीही सभा नसताना चमकोगिरी करण्यासाठी धावत सुटले. पण आता ज्या वादात ते अडकलेत, ते अत्यंत गंभीर आहे. जादुटोण करणाऱ्या […]

'पुरोगामी' पवारांचा नातू वादग्रस्त फादरच्या दरबारात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

दापोडी (पुणे) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सध्याचे सर्वात जास्त चर्चेतले उमेदवार ठरलेत. एक तर त्यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागली, त्यानंतर त्यांचं भाषण फसलं, नंतर ते कुठलीही सभा नसताना चमकोगिरी करण्यासाठी धावत सुटले. पण आता ज्या वादात ते अडकलेत, ते अत्यंत गंभीर आहे. जादुटोण करणाऱ्या एका फादरच्या भेटीनं पार्थ वादात सापडलेत.

उच्चविद्याविभूषित, मॉडर्न, तरुण-तडफदार अशी ओळख निर्माण केलेले पार्थ पवार वादग्रस्त फादर सिल्वेंच्या भेटीला पोहोचले. दापोडीच्या चर्चमध्ये हा सगळा सोहळा रंगला. पार्थ पवारांचं अगोदर स्वागत करण्यात आलं आणि नंतर त्यांच्या विजयासाठी फादरनं प्रार्थना म्हटली. अर्थातच समोर गोरगरीब जनताही बसलेली होती. फादर लोकांवर जादू करतात तशी पार्थ पवारांवरही करण्याचा प्रयत्न केला. पार्थनेही डोळे मिटले, पण इतरांसारखं पार्थ काही कोसळले नाहीत.

पार्थ पवारही या सगळ्या प्रक्रियेत अवघडलेले दिसले. जसेही पार्थ पवार व्यासपीठावर गेले, त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी वादग्रस्त फादरचे जवळ जाऊन आशीर्वाद घेतले. फादरची माणसंही पार्थ पवारांना बसलेल्या फादरचे आशीर्वाद घेण्यासाठी इशारे करत होते. पण पार्थ यांना सगळा अंदाज असावा. शेवटी फादर स्वत:च उठून पार्थ यांच्याजवळ आले आणि आशीर्वाद दिले. पार्थ यांनी घेतलेला हा आशीर्वादच आता वादग्रस्त ठरला आहे. मात्र, पार्थ कधीही कमीपणा येईल, असं वागणार नाही असं आई सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

फादर सिल्वे आणि त्यांच्या पत्नीवर जादूटोण्याचे आरोप आहेत. लोकांना भूलवून त्यांचे रोग बरे करण्याचे दावे फादर सिल्वे करतात. पार्थ पवार आशीर्वादाला गेले, त्यावेळेसही फादरच्या स्पर्शानं अनेक जण जाग्यावर कोसळत होते. समोरची माणसं फादरच्या बोलण्यावर धायमोकलून रडत असल्याचं चित्रं होतं. माहौलच काही तरी वेगळा होता. फादर सिल्वेंच्या अशा कृतीचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीनी चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. पण बुवाबाजी करणाऱ्यांची महाराष्ट्रात अजूनही कमी नाही. अशाच काही सनातनी लोकांच्याविरोधात मोहीम चालवल्यानं दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली. खुद्द ज्येष्ठ पवारही कायम अशा बुवाबाबांपासून दूर राहिलेत. पण मावळची लढाई पार्थ यांच्यासाठी सोपी नाही आणि सहजही नाही. त्यामुळे एका-एका मतासाठी पार्थ पवार अशा बाबांच्या दरबारात हजेरी लावताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.