तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांवर पलटवार

सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली. (Sadabhau Khot criticism on Sharad Pawar)

तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांवर पलटवार
जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला?
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 7:39 AM

धुळे : आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार (Sharad Pawar) हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लगावला. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही, अशा शब्दात शेख यांनी निशाणा साधला. (NCP Mehboob Shaikh on Sadabhau Khot criticism on Sharad Pawar)

सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले.

“आपण ज्या नर्सरीत शिकता…”

पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणे यांना अपेक्षित आहे का आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब आहेत, हे सिद्ध करुन दाखवल्याचं मेहबूब शेख म्हणाले.

“सदाभाऊ खोत कडकनाथ कोंबडीवाले”

सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही. सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, ते काहीही बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

धुळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु मेहबूब शेख यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सारवासारव केली. हा परिवार मेळावा होता आणि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असण्याचा संबंध येत नाही, कार्यकर्त्यांमध्ये काही गोष्टींमुळे नाराजी असल्याने त्यांच्या मनातील काही प्रमाणात असलेला राग त्यांना व्यक्त करायचा होता, असं शेख यांनी स्पष्ट केलं. (NCP Mehboob Shaikh on Sadabhau Khot criticism on Sharad Pawar)

“राडा नाही, शाब्दिक चकमक”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील घडल्या प्रकाराबाबत माहिती देताना असं काही नेमकं घडलंच नाही, असं सांगितलं. कार्यकर्त्यांच्या मनात काही गोष्टींची शंका होती. ती विचारताना शाब्दिक चकमक झाली, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी नाही, असंही चाकणकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

(NCP Mehboob Shaikh on Sadabhau Khot criticism on Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.