AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर, भावाचं रुक्मिणी मातेला साकडं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर, भावाचं रुक्मिणी मातेला साकडं
| Updated on: Nov 27, 2020 | 1:58 PM
Share

सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांची प्रकृती चिंताजनक आहे. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात करुन घरी परतले. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने काही दिवसापूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital ) दाखल करण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (NCP MLA Bharat Bhalke critical admitted in Ruby Hospital pune)

भारत भालके यांची कोरोना चाचणी 30 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. मात्र लगेचच 4 नोव्हेंबरला ते कोरोना मुक्त झाले आणि घरी आले होते. परत गेल्या आठवड्यात त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुबी हॉस्पिटला अॅडमिट झाले होते. कालपासून त्यांची तब्येत खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना किडनीचा आजार तसेच मधुमेहाचा त्रास आहे.

विठूरायाला साकडे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, जनतेच्या सेवेसाठी ते परत लवकर बरे होऊन यावेत यासाठी आमदार भालके यांचे धाकटे बंधू पंजाबराव भालके (Panjabrao Bhalke) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला साकडे घातले. “भारत भालके यांच्या प्रकृतीत आज दुपारी सुधारणा होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, लवकर या संकटातून बाहेर यावेत” असं साकडं त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी घातलं.

याबाबत त्यांनी सांगितले  की, त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारास ते प्रतिसाद देत आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वत:चं घर क्वारंटाईन सेंटरला दिले

सोलापूरनंतर आता पंढरपुरातही कोरोनाने मोठा शिरकाव केला होता. त्यावेळी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला त्यांचा दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मे महिन्यात तसे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले.

भारत भालकेंची हॅटट्रिक

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर भारत भालके हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते, मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवून, हॅटट्रिक केली.

कोण आहेत भारत भालके?

  • भारत भालके हे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आहेत
  • भारत भालके यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता
  • मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले.
  • भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते
  • भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला होता

(NCP MLA Bharat Bhalke critical admitted in Ruby Hospital pune)

संबंधित बातम्या 

काँग्रेस आमदार भारत भालकेंचं ‘जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी’ 

आधी शिवसेना खासदाराकडून घर, आता राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी जाहीर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.