AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोराला फटकावलं की बापाला घेऊन येतो, तसं मुख्यमंत्र्यांचं झालंय, मोदी-शाहांना घेऊन आलेत : अमोल कोल्हे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आघाडीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe attacks Devendra Fadnavis)  यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

पोराला फटकावलं की बापाला घेऊन येतो, तसं मुख्यमंत्र्यांचं झालंय, मोदी-शाहांना घेऊन आलेत : अमोल कोल्हे
| Updated on: Oct 11, 2019 | 6:28 PM
Share

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आघाडीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe attacks Devendra Fadnavis)  यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. “मुख्यमंत्री म्हणतात सध्या कोणी विरोधकच समोर दिसत नाही,आखाड्यात पैलवान नाही. मग सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय महाराष्ट्रत आखाडा खोदायला येणार का?” असं खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe attacks Devendra Fadnavis) म्हणाले.

‘पोराला फटकावलं की बापाला घेऊन येतो’

एका राज्याची निवडणूक असताना तुम्हाला पंतप्रधानांच्या दहा सभा घ्याव्या लागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वीस सभा घ्याव्या लागतात, यात तुम्ही कबुली देताय की पाच वर्षात तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे. कारण आमच्याकडे असायचं की, पोराला शाळेत फटकावलं की पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, तशी तर परिस्थती मुख्यमंत्र्यांवर नाही ना आली? असा टोला अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

302 चा गुन्हा कोणावर दाखल करायचा?

या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजणार आहेत.. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारने निर्यात बंद केली आणि पाकिस्तानवरून कांदा आयात करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सांगा मुख्यमंत्री आता कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला.

या सरकारने हजारो कोटींचे कर्ज घेतले, मात्र काहीच केले नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्राची स्वप्न दाखवली, मात्र नोकरी कोणालाच नाही. 2014 ला बॅनरवर शिवाजी महाराजांचे फोटो होते, मग गडकिल्यांचं काय? ज्या वाघांचं मांजर झालं त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची गरज नाही. गडकिल्यांचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेचा वाघ कुठं गेला होता ? हे सरकार ईडीची धमकी देतंय पण एक ईडीसारखा दगड शरद पवारांवर मारला तेव्हा महाराष्ट्र आग्या मोहळसारखा पेटून उठला हे लक्षात ठेवा, असं अमोल कोल्हे म्हणाले.

21 तारखेला बाहेर पडताना एकच आठवा ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. ती फिरवा, असं आवाहन त्यांनी केलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.