शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, विक्रमवीर अपक्ष आमदाराची स्तुतिसुमनं, ‘घड्याळ’ बांधण्याच्या चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्या दोन दिवसात चंद्रपूरमध्ये त्यांच्या सभा, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, विक्रमवीर अपक्ष आमदाराची स्तुतिसुमनं, 'घड्याळ' बांधण्याच्या चर्चा
शरद पवार आणि किशोर जोरगेवार यांची भेट
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 12:43 PM

चंद्रपूर : ‘पितामह भीष्म’ यांचा आशीर्वाद असला की राजकीय वाटचाल सफल होईल, असं म्हणत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चंद्रपुरात (Chandrapur) भेट घेतली. या भेटीगाठींमुळे जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याच्या शक्यतांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्या दोन दिवसात चंद्रपूरमध्ये त्यांच्या सभा, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

काय म्हणाले किशोर जोरगेवार?

ही भेट अविस्मरण असल्याची भावना जोरगेवारांनी बोलून दाखवली. “शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह आहेत. त्यांची भेट घेणे, चंद्रपूरच्या विकासावर चर्चा करणे ही मोठी उपलब्धी आहे. शरद पवारांनी मला मुंबईला भेटायला बोलवलं होतं. त्यांचा आशिर्वाद असल्यास राजकीय वाटचाल सफल होईल” असे जोरगेवार म्हणाले.

जोरगेवारही ‘घड्याळ’ हातात बांधतील का?

आता किशोर जोरगेवारही ‘घड्याळ’ हातात बांधतील काय ? या चर्चेला आता ऊत आला आहे. “अपक्ष हा एक स्वतंत्र पक्ष असतो. त्याला कोणत्याही पक्षात जाता येत नाही” असे जोरगेवारांनी म्हटले असले तरी जोरगेवारांचा ओढा राष्ट्रवादीकडे असल्याचे त्यांचा बोलण्यातून निदर्शनात येत आहे.

कोण आहेत किशोर जोरगेवार?

किशोर जोगरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत सुरुवातीपासून ते शिवसेनेशी निगडित आहेत चंद्रपुरातील मागास प्रवर्गाच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे

राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये सर्वाधिक विक्रमी मताने किशोर जोरगेवार यांचा विजय झाला आहे. किशोर जोरगेवार यांनी भाजपचे नाना शामकुळे यांचा 72 हजार मतांनी पराभव केला. यावरुन स्पष्ट होते की जोरगेवार यांचे चंद्रपुरात वजन आहे.

जोरगेवारांचा यू टर्न

खरं तर किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपला अर्थात तत्कालीन शिवसेना-भाजप महायुतीला 2019 मध्ये पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर जोरगेवार यांनी यू-टर्न घेत थेट विधानसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या :

चंद्रपूरच्या अपक्ष आमदाराचा यू-टर्न

सकाळी धर्मराव बाबा आत्रामांची शरद पवारांना गळ, दुपारी पवारांकडून लोकसभेचा शब्द!

ही विधानसभा शेवटची, आता दिल्लीत पाठवा, माजी राज्यमंत्र्यांची पवारांना जाहीर मंचावर गळ

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.