AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं; राम मंदिर मुद्द्यावरुन पवारांचा राज्यपालांना टोला

ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं; राम मंदिर मुद्द्यावरुन पवारांचा राज्यपालांना टोला
| Updated on: Jan 15, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार आहेत.  नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात 15 जानेवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. घटनात्मक पदावर असताना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं कितपत योग्य आहे?, याची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याचप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सणसणीत टोला लगावला आहे. (NCP Sharad Pawar Taunt Governor Bhagatsinh Koshyari Over Ram Mandir)

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्यात वादळ उठलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला स्मरुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सध्या विरोधी पक्ष करत आहेत. तसंच राष्ट्रवादीच्याही वरिष्ठ नेत्यांमध्ये याचप्रकरणी गुफ्तगू सुरु आहे. याचविषयी सविस्तर बोलण्यासाठी पवार माध्यमांसमोर आले. यावेळी पत्रकारांनी राज्यपालांवर प्रश्न विचारला असता त्यांनी टोलेबाजी केली.

“राज्याचे राज्यपाल हे सर्वांचे आहेत. ते राज्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत. ज्या प्रश्नाबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होते त्यावेळी अशा प्रश्नांपासून दूर राहण्याचं काम शहाणपणाचं आहे असं मला वाटतं”, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला.

राम मंदिर निधी संकलन कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती

नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात 15 जानेवारीला सायंकाळी 7.30 वाजत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत निधी संकलनाला सुरुवात होणार आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संघ विचारांचे आहेत. त्यांचं संघप्रेम गेल्या वर्षभरात लपून राहिलेलं नाही. नागपूर दौऱ्यात त्यांनी संघाच्या प्रमुखांची भेट घेतली होती. तसंच मंदिर उघडण्याच्या मागणीवरही विरोधी पक्षांचं आंदोलन सुरु असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करुन दिली होती. एकंदरितच कोश्यारी प्रखर हिंदुत्ववादी आहेत. मात्र घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवू नये, असा प्रघात आहे. राज्यपालांच्या उपस्थितीवरुन सध्या महाराष्ट्रात बरीच चर्चा रंगते आहेत.

(NCP Sharad Pawar Taunt Governor Bhagatsinh Koshyari Over Ram Mandir)

हे ही वाचा

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका

मुंडे प्रकरणात ACP दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने चौकशी करावी: शरद पवार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.