गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है… अजित पवार नाराज? गजानन काळेंच्या वक्तव्यात तथ्य?

81 वर्षांचे शरद पवार एवढे आजारी असताना  शिबीरात पोहोचले अन् अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे-मागे का करता आला नाही, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय.

गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है... अजित पवार नाराज? गजानन काळेंच्या वक्तव्यात तथ्य?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 6:14 PM

मुंबईः गंभीर आजारपण असतानाही शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डी येथील मंथन शिबीरात यांनी लावलेली उपस्थिती गेले. अवघ्या महाराष्ट्रासाठी ही उपस्थिती लधवेधी ठरली. यापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. हाच मुद्दा पकडत मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलंय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात. आजचं हे चित्र अधिक बोलकं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, असं सांगणारं असल्याचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.

गजानन काळे यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, ‘आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं.

आपल्या पक्षात नाराज असलेले आमदार आणि गुवाहटीच्या वाटेवर हे जणू राज्यातील राजकारणात बंडखोरीचे संकेत देणारं समीकरण बनलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या मेळाव्यात शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहतील, असं म्हटलं जात होतं. मात्र न्यूमोनिया झाला असताना, हाताचे बँडेज घेऊन शरद पवार थेट हेलिकॉप्टरने शिर्डीत पोहोचले.

पाचच मिनिटं भाषण करून पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. शिर्डीतील मंथन शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 100 चा नारा दिला आहे.

शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

मात्र अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. शिंदे शरद पवार यांना भेटायला गेल्याचेही अनेक राजकीय अर्थ निघू लागलेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय.

अजित पवार यांचा आजच्या तारखेला दुसरा नियोजित कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता. त्यामुळे माझ्या परवानगीनेच ते येथे गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. तरीही 81 वर्षांचे शरद पवार एवढे आजारी असताना  शिबीरात पोहोचले अन् अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे-मागे का करता आला नाही, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.