AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठंतरी काहीतरी शिजतंय, देशात विरोधीपक्षातील नेत्यांवर केसेस दाखल होताहेत-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या बाबत बोलताना महत्वाचं विधान केलंय.

कुठंतरी काहीतरी शिजतंय, देशात विरोधीपक्षातील नेत्यांवर केसेस दाखल होताहेत-सुप्रिया सुळे
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 03, 2022 | 4:07 PM
Share

नाविद पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बाबत बोलताना महत्वाचं विधान केलंय. कुठंतरी काहीतरी शिजतंय, देशात 90 टक्क्यांपेक्षा जास्त विरोधीगटातील नेत्यांवर केसेस आहेत, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. “एक बातमी आली होती. देशात 90 टक्के पेक्षा जास्त केसेस या विरोधकांवर आहेत. त्यांना एटक केली जात आहे. जे विरोधात बोलतात त्यांच्यवरच्या कारवाईमध्ये वाढ झाली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या बारामतीत बोलत होत्या.

“अजितदादा, मी पण पंढरपुरातल्या संघाच्या शाखेत जायचो”, असं शहाजी बापू पाटील म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी शहाजीबापू पाटलांच्या या विधानावरही भाष्य केलंय. शहाजी बापू पाटलांना वाटतं. तसं ते बोलतात, विरोधक पण दिलदार असला पाहिजे. दादा म्हणतो ना ज्या आंब्याला आंबे असतात त्यालाच माणसं दगड मारतात…बाभळीच्या झाडाला कोण मारते का? कायतरी असेल म्हणून रोज टीका करतात ना?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शिवसेनेचं चिन्ह असणाऱ्या धनुष्यबाणा बाबत सुनावणी झाली. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसपासून वेगळा झाला. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. तरीही आम्ही निवडणूक जिंकलोच की. शिवसेनेचं चिन्ह जरी गोठवलं किंवा ते मिळालं नाही. तरी कोणत्याही संघटनेला आलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवघड होणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ