शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास संख्याबळ आणि आकड्यांचं गणित कसे असेल?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत (NCP to support Shiv sena) जाण्याची तयारी आहे, मात्र काँग्रेस तयार (NCP to support Shiv sena)नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास संख्याबळ आणि आकड्यांचं गणित कसे असेल?
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 11:36 AM

नवी दिल्ली : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरु असताना, नवी राजकीय समीकरणं जुळण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली.  या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत (NCP to support Shiv sena) जाण्याची तयारी आहे, मात्र काँग्रेस तयार (NCP to support Shiv sena)नाही. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादी तयार आहे. मात्र शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस सहमत नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, आज शरद पवार हे मुंबईतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. शरद पवार पुन्हा सोनियांची भेट घेणार आहेत. कालच त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन्याबाबत सोनिया गांधी यांनी विचार करायला वेळ मागितला आहे. एकीकडे शरद पवार आज मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांनी पुन्हा सोनिया गांधी-शरद पवारांची भेट होणार आहे. त्यामुळे शरद पवार-सोनिया गांधी नेमकी कोणती रणनीती आखत आहेत, याबाबत उत्सुकता आहे.

जर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यास संख्याबळ कसे?

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. राष्ट्रवादीचं संख्याबळ 54 आहे. शिवसेना + राष्ट्रवादी = 118 संख्याबळ होते. जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर त्यामध्ये 44 आमदारांची भर पडेल, त्यामुळे संख्याबळ 162 वर पोहोचेल. 288 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 145 आमदारांची गरज असते.

संख्याबळ

शिवसेना (64) + राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) 64 + 54 + 44 = 162

महाआघाडीतील पक्ष – बहुजन विकास आघाडी (03), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02) – 162 + 6 = 168

शरद पवार-सोनियांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर चर्चा झाली. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करुन पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सरकार बनवण्यासाठी आमच्याकडे संख्या नाही, असं पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सोबत होते.

“आम्ही भाजप-शिवसेनाविरोधात निवडणूक लढवली आहे. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. संजय राऊत यांनी 175 जागांचं गणित कसं केलं हे माहिती नाही, आम्हाला कुणीही प्रस्ताव दिलेला नाही किंवा काही विचारलेलं नाही. आज महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठीचं संख्याबळ आमच्याकडे नाही. पुढे काय होतं ते पाहावं लागेल. सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली, असं शरद पवार म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.