राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात

पुणे : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय. कर्जाचा मोठा डोंगर या कारखान्यावर असताना कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. आता घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. असं असताना कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी चेअरमन आणि माजी आमदार अशोक पवारांवर गंभीर […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय. कर्जाचा मोठा डोंगर या कारखान्यावर असताना कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. आता घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. असं असताना कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी चेअरमन आणि माजी आमदार अशोक पवारांवर गंभीर आरोप करत राजीनामा दिलाय.

ग्रामीण भागातील शेतकरी सध्या ऊसाच्या शेतीमुळे कसाबसा उभा राहतोय. पण घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भष्टाचाराचं ग्रहण लागलंय. घोडगंगा साखर कारखान्यात कामगारांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप केला जातोय. दुसरीकडे संचालकांकडूनच कारखान्याची जमीन विश्वासात न घेताच एका ट्रस्टला दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांचं कारखान्याबाहेर दहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर तब्बल 181 कोटी रुपयांचं कर्ज आहे. 2018-2019 च्या अंदाजपत्रकात कारखान्याने 37 कोटी 94 लाख रुपयांची कर्जफेड केल्याचे नमूद आहे. मात्र तरीही कारखान्यावर अद्याप 150 कोटी रुपयांचं कर्ज आहे. सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खासगी कारखाने सुरु ठेवायचे असा घाट घातला जात असल्याचे आरोप केले जातात. मात्र हे सर्व आरोप चुकीचे असून आम्ही चौकशीला संचालक मंडळ तयार असल्याचं चेअरमन माजी आमदार अशोक पवार सांगत आहेत. पवारांच्या संचालक मंडळातील सुधीर फराटे यांनीच कारखान्यांच्या कामकाजावरच काही प्रश्नचिन्ह उपस्थित करुन राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न विचारला जात असताना घोडगंगा साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करत असताना विश्वासात घेतलं जात नसून, चुकीच्या पद्धतीने हुकूमी कारभार चेअरमन पवारांकडून केल्याचा आरोप फराटे यांनी केलाय.

घोडगंगा सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला असताना या कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या नातेवाईकांचा श्री व्यंकटेश कृपा हा खासगी कारखाना मात्र तेजीत सुरु असल्याचं चित्र इथे पाहायला मिळत आहे.

घोडगंगा साखर कारखान्यात झालेला भष्ट्राचार हा संजय पाचंगे यांनी सुरु केलेल्या उपोषणातून पुढे आला. त्याची चौकशीही सुरु झाली. मात्र यातून आजी – माजी आमदार यांच्यात मतांच्या राजकारणाचे राजकीय युद्ध सुरु झालंय हे नक्की.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें