महासेनाआघाडीचा पहिला विजय कोल्हापुरात, शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर

राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या महासेनाआघाडीभोवती (Kolhapur mayor election) फिरत आहे.

महासेनाआघाडीचा पहिला विजय कोल्हापुरात, शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 12:17 PM

कोल्हापूर : राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या महासेनाआघाडीभोवती (Kolhapur mayor election) फिरत आहे. राज्याला नवा सरकार कधी मिळणार हा प्रश्न अद्याप कायम असताना, तिकडे कोल्हापुरात (Kolhapur mayor election)  महासेनाआघाडीने पहिला विजय मिळवला आहे. कारण कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड सूरमंजिरी लाटकर (Surmanjiri Latkar Kolhapur mayor) यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (Surmanjiri Latkar Kolhapur mayor) यांची गेल्या चार वर्षापासून इथे आघाडी आहे.

दरम्यान सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या आहेत. लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला.  महापौर- उपमहापौर निवडीला शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. गेल्या चार वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होतं. मात्र पक्षीय राजकारण आल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघडीची मोट बांधत सत्ता संपादन केली आहे. त्याला शिवसेनेचीही साथ मिळाली आहे.

महापौरपदाचे तुकडे

एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे कोल्हापुरात पुन्हा एकदा महापौर बदलाच्या हालचाली सुरु होत्या. नगरसेवक सांभाळण्यासाठी महापौरपदाचे तुकडे पाडून दर तीन किंवा सहा महिन्याला महापौर बदलला जात आहे. त्यामुळे दर चार महिन्यांनी होणाऱ्या बदलामुळे पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

सूरमंजिरी लाटकर नव्या महापौर

कोल्हापूर महानगरपालिकेत महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूरमंजिरी लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामधाम येथे पार पडली होती. या बैठकीत लाटकर यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सत्ता फॉर्मुला यशस्वी झाला, तसाच तो राज्यातही होईल असा विश्‍वास यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला होता. आज महापौरपदाची निवडणूक होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला होता. तसंच सर्वांना सहलीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं.

महापालिकेत महिलाराज

गेल्या दहा वर्षात अनुसूचित जाती,सर्वसाधारण, ओबीसी,आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेलं कोल्हापूरचा महापौरपद पुन्हा एकदा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालं. सलग चार आरक्षणे महिलांसाठी आरक्षित झाल्याने महापालिकेत पुन्हा एकदा महिलाराज आलं आहे. 13 नोव्हेंबरला झालेल्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक असलेल्या सर्वच प्रवर्गातील पुरुष वर्गाची निराशा झाली.

कोल्हापूर महापालिकेचा इतिहास 

  • 1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली.
  • नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर होते.
  • 1978 पासून आतापर्यंत 48 महापौरांनी कार्य़भार सांभाळला
  • गेल्या 10 वर्षात 14 महापौर करवीरवासियांनी पाहिले
  • 2018 पासून आतापर्यंत तब्बल 4 महापौर बदलण्यात आले आहेत.
  • महापौरपदाबरोबरच आता स्थायी समिती सभापतीपदाच्या खांडोळीचाही प्रघात मागच्या वर्षीपासून पडला आहे.
Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.