नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी : नीलम गोऱ्हे

नारायण राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत शिवसेनेवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या (Neelam Gorhe slams Narayan Rane).

नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी : नीलम गोऱ्हे
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 5:59 PM

मुंबई :भाजप नेते नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे. टीव्हीवर जसं एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असं म्हटलंय तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत”, असा घणाघात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. नारायण राणे यांनी दिवाळीनंतर भाजप सरकार पडणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस राबविणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं (Neelam Gorhe slams Narayan Rane).

नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत (Neelam Gorhe slams Narayan Rane).

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

“किरीट सोमय्या यांचं व्यक्तीमत्व पाहिलं तर त्यांचे विषय जेवनातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला”, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.

“उद्धव ठाकरे ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’चं केलेलं आवाहन त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाला उद्देशून म्हणाले नाहीत. तर संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारतातील जनता माझं कुटुंब आहे, याची काळजी घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्याप्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेचं दिशाभूल होत आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हे सर्व राजकीय वैफल्याचं दर्शन आहे”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा नारायण राणे यांनी केला. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आणखी आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करणे हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणूनच हा प्रश्न करत आहे. सामान्य व्यक्ती असता तर विचारलंही नसतं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

ठाकरे-वायकरांनी किती जमिनी एकत्रित खरेदी केल्या?; जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का?; सोमय्यांचा सवाल

बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, निवडणुकीच्या निकालाआधी शिवसेनेचा इशारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.