बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

राज्य सरकारने फटाके वाजवण्यावर बंदी घालून हा आनंद हिरावून घेऊ नये. | Narayan Rane

बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 3:51 PM

मुंबई: बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. (BJP leader Narayan Rane give hints about operation lotus in Maharashtra)

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याने आणि त्यांच्या इतर समस्या सोडवल्यामुळे भाजपला बिहारमध्ये विजय मिळाला, असा दावा नारायण राणे यांनी केला.

यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या फटाकेमुक्त दिवाळी या धोरणाचा विरोध केला. दिवाळी हा आमचा आनंद साजरा करण्याचा सण आहे. हा लहान आणि मोठ्यांचा दोघांचाही सण आहे. त्यामुळे राज्य सरकारने फटाके वाजवण्यावर बंदी घालून हा आनंद हिरावून घेऊ नये. माझा फटाकेमुक्त दिवाळीला विरोध आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले होते.

बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

“पवारांच्या सल्ल्याने नितीश कुमारांनी बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवावा”

संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे

महाराष्ट्रात घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चे काय सांगावे; शेलारांचा सूचक इशारा

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, निवडणुकीच्या निकालाआधी शिवसेनेचा इशारा

(BJP leader Narayan Rane give hints about operation lotus in Maharashtra)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.