“पवारांच्या सल्ल्याने नितीश कुमारांनी बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवावा”

बिहारमध्ये सरकार स्थापन करताना जनता दल यूनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यावा. नितीश यांनी बिहारमध्ये महाराष्ट्रासारखा पॅटर्न राबवावा असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीश कुमार यांना दिला आहे.

पवारांच्या सल्ल्याने नितीश कुमारांनी बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवावा
Uday Samant
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 6:12 PM

रत्नागिरी : बिहारमध्ये सरकार स्थापन करताना जनता दल यूनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यावा. नितीश यांनी बिहारमध्ये महाराष्ट्रासारखा पॅटर्न राबवावा असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीश कुमार यांना दिला. ते रत्नागिरीत बोलत होते. (for forming government in Bihar Nitish Kumar should take suggestions from Sharad Pawar said uday samant)

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यावेळी बिहारच्या जनतेने एनडीएला कौल देत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे. मात्र, याविषयी महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीश कुमार यांनी महाराष्ट्रासारखा पॅटर्न राबवून सत्ता स्थापन करावी असा सल्ला दिला आहे. त्यासाठी शरद पवारांचा सल्लाही घेता येईल असं उदय सामंत म्हणाले.

” राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलेली टक्कर नक्कीच कौतुकास्पद आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितिश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न  बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो” असं सामंत म्हणाले.

भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतोय

“भाजप प्रादेशिक पक्षांना कसा संपवतो हे बिहार निवडणुकीच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा कळलंय. नितीश कुमार यांच्या रुपाने हे सर्व देशाने पाहिलं आहे. तसेच ज्या ठिकाणी नितीश कुमारांची शिडी घेऊन भाजप पक्ष मोठा झाला त्याच नितीश कुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला.” असे म्हणत, एखाद्या प्रादेशिक पक्षाला कसं संपवलं जातं याचं महाराष्ट्रानंतरचं दुसरं उदाहरण बिहार असल्याची टिका उदय सामंत यांनी केली.

संबंधित बातम्या :

Bihar Election ! सर्वात मोठा पक्ष तरीही तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत का पोहचू शकले नाहीत?; ‘ही’ आहेत चार कारणे!

Bihar election result 2020: बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

(for forming government in Bihar Nitish Kumar should take suggestions from Sharad Pawar said uday samant)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.