Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी सातत्यानं काँग्रेस आणि RJDवर टीकास्त्र डागलं. सीमांचल परिसरातील जनतेची उपेक्षा होण्यास काँग्रेस आणि RJDच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर ओवेसी आपल्या प्रचारादरम्यान सातत्यानं NRC आणि CAA चा मुद्द्यावर मोठा जोर लावल्याचं पाहायला मिळालं.

सागर जोशी

|

Nov 11, 2020 | 9:19 AM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. (Asaduddin Owaisi’s MIM wins 5 seats in Seemanchal)

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी सातत्यानं काँग्रेस आणि RJDवर टीकास्त्र डागलं. सीमांचल परिसरातील जनतेची उपेक्षा होण्यास काँग्रेस आणि RJDच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर ओवेसी आपल्या प्रचारादरम्यान सातत्यानं NRC आणि CAA चा मुद्द्यावर मोठा जोर लावल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ओवीसींचा MIM हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप RJD आणि काँग्रेस करत राहिली.

ओवेसींच्या MIM मुळे महाआघाडीला फटका

ओवेसी यांच्या MIM पक्षाने सीमांचल प्रांतात मजबूत पकड निर्माण केल्याचं काँग्रेसचे आमदार प्रेमचंद्र मिश्रा यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाआघाडीला मोठा फटका बसल्याचंही मिश्रा म्हणाले. ओवेसी यांनी कोणत्या तरी खास कारणामुळे महाआघाडीचा गड असलेल्या सीमांचलमध्ये उमेदवार उभे केल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.

राजदचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनीही ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसींमुळेच महाआघाडीच्या उमेदवारांना फटका बसला. सीमांचलमधील मतांची टक्केवारी पाहिली तर अशी एकही जागा नाही जिथे NDAचा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी MIM च्या उमेदवाराला जास्त मतं पडली आहेत, असा आरोप गगन यांनी केला आहे.

सर्वात मोठा पक्ष, तरी सत्तेपासून दूर!

बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तेजस्वी यादव यांच्या तरण्याबांड नेतृत्वाखाली राजदने 75 जागा मिळवल्या आहेत. तर 74 जागा मिळवत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDUला 43 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.

संबंधित बातम्या:

Bihar election result 2020: बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

Asaduddin Owaisi’s MIM wins 5 seats in Seemanchal

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें