Bihar election result 2020: बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात नितीश कुमार यांच्या JDUला फक्त 43 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर बिहार NDAमध्ये आतापर्यंत छोटा भाऊ असलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला 74 जागा मिळाल्या आहेत.

Bihar election result 2020: बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 8:20 AM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीबाबत प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार शेवटच्या टप्प्यात विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसा तो बसलाही. पण सुशासन बाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDAसत्तेचा सोपान गाठण्यात यशस्वी ठरली आहे. मंगळवारी लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात नितीश कुमार यांच्या JDUला फक्त 43 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर बिहार NDAमध्ये आतापर्यंत छोटा भाऊ असलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला 74 जागा मिळाल्या आहेत. (What is the reason behind Nitish Kumar setback in Bihar?)

बिहारमध्ये भाजपसाठी नितीश फॅक्टर का महत्वाचा?

बिहारमध्ये JDUला 43 जागांवर समाधान मानावं लागलं त्यामागे अनेक कारणं आहेत. बिहारमध्ये यंदा नरेंद्र मोदी फॅक्टर चालला असला तरी त्यामागे नितीश कुमार यांचा चेहराही तितकाच महत्वाचा आहे. स्वत: पंतप्रधान मोदीही हे मान्य करतात. कारण ‘आपल्याला बिहारच्या विकासासाठी नितीश कुमार सरकार हवं आहे’ असं वक्तव्य अनेक जाहीर सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्या मित्रपक्षाचं नाव घेऊन अशाप्रकारे मत मागताना कधी पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य नितीश कुमार यांचं बिहारमधील महत्व स्पष्ट करतं. त्याचबरोबर हे ही लक्षात येतं की या निवडणुकीत नितीश फॅक्टर NDAच्या विजयासाठी का आणि किती महत्वाचा आहे.

चिराग पासवान यांनी वेगळी चूल मांडल्यानं JDUला फटका

सलग 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या JDUला यावेळी मोठा फटका बसण्यामागे मुख्य कारण आहे, ते म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान. बिहार विधानसभा निवडणुकीत चिगार पासवान यांनी स्वतंत्रपणे शड्डू ठोकला. संपूर्ण निवडणूक प्रचारात त्यांनी स्वत:ला मोदी भक्त संबोधलं आणि नितीश कुमार यांच्यावर मात्र जोरदार हल्ला चढवत राहिले.

राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार चिराग पासवान यांच्या LJPने किमान 40 जागांवर नितीश कुमार यांच्या उमेदवारांच्या विजयाचं गणित बिघडवलं. NDAतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा चिराग पासवान यांना फार फायदा होऊ शकला नाही. पण त्यांनी JDUला मात्र मोठ्या प्रमाणात डॅमेज केलं. एकूण 243 पैकी 137 जागांवर LJPने आपले उमेदवार उतरवले होते. यातील 40 जागा अशा आहेत, जिथे सरळ-सरळ JDUला मोठा फटका बसला.

तेजस्वी यादव यांना कमजोर समजणं महागात

नितीश कुमार यांचा JDU आणि लालू प्रसाद यादव यांच्या RJD मधील आघाडी तुटल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्याप्रमाणात चिखलफेक झाली. तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांनी नितीश कुमारांवर वारंवार टीका केली. तर नितीश कुमार यांनीही दोन्ही यादव बंधूंच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले. पण बिहारची जनता तेजस्वी यादव यांना गंभीरतेनं घेईल असा विचार नितीश कुमार यांनी केला नाही.

तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणुकीत बिहारमधील महापूर, शेल्टर होम कांड, कोरोना, बेरोजगारी अशा बिहारच्या जनमनातील मुद्द्यांना हात घातला. RJDने लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत ही निवडणूक लढवली. अशा स्थितीतही तेजस्वी यादव यांनी दिलेला लढा पाहून बिहारच्या रणसंग्रामात आता ‘लालू चा लाल’ उदयाला आल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. मात्र, तेजस्वी यांना गंभीरपणे न घेण्याची चूक नितीश कुमारांना चांगलीच महागात पडली आहे.

काँग्रेसला 70 जागा देणं तेजस्वी यादव यांची चूक?

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस बिहारमधील महाआघाडीसाठी एक ओझं बनल्याचं दिसत आहे. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला 70 जागा देऊन चूक केली अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

तेजस्वी यादव यांनी अजून काही जागांवर RJDचे उमेदवार उभे केले असते आणि अजून 10 जागांवर त्यांना विजय मिळाला असता तर आज महाआघाडी बहुमताच्या जादूई आकड्यापर्यंत पोहोचली असती. मात्र, काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची थोडक्यात हुकली.

दरम्यान, यंदाची बिहार विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. यात नितीश कुमार यांना मोठा झटका बसला. तर भाजप बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली RJDने 75 जागांवर मजल मारत भविष्यातील बिहारमधील आपली वाटचाल अधिक स्पष्ट केली. राष्ट्रीय राजकारणातही तेजस्वी यादव यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनाही आता आत्मपरिक्षण करावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

What is the reason behind Nitish Kumar setback in Bihar?

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.