AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद नेते तेजस्वी यादव आणि लोजपा नेते चिराग पासवान यांनी बिहारची निवडणूक ढवळून काढली असली तरी पुष्पम प्रिया चौधरी, लव सिन्हा, पप्पू यादव, लवली आनंद आणि सुभाषिनी बुंदेला हे उमेदवार सुद्धा या निवडणुकीत चर्चेत राहिले आहेत. (Pushpam priya, Pappu yadav, luv sinha loss in Bihar Election)

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!
| Updated on: Nov 11, 2020 | 11:26 AM
Share

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद नेते तेजस्वी यादव आणि लोजपा नेते चिराग पासवान यांनी बिहारची निवडणूक ढवळून काढली असली तरी पुष्पम प्रिया चौधरी, लव सिन्हा, पप्पू यादव, लवली आनंद आणि सुभाषिनी बुंदेला हे उमेदवार सुद्धा या निवडणुकीत चर्चेत राहिले आहेत. हे पाचही जण बिहार निवडणुकीत हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले असले तरी निवडणूक मात्र त्यांना जिंकता आली नाही. (Pushpam priya, Pappu yadav, luv sinha loss in Bihar Election)

पुष्पम प्रिया चौधरी यांनी तर स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. प्लुरल्स पार्टीच्या नेत्या असलेल्या पुष्पम प्रिया या दोन विधानसभा मतदारसंघातून उभ्या होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणाहून त्या पराभूत झाल्या. बांकीपूर आणि बिस्फीसमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना बिस्फीमध्ये नोटापेक्षाही कमी म्हणजे 1509 मते मिळाली. बांकीपूरमध्ये त्यांना 5189 मते मिळाली. दोन्ही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हाही या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी होते. ते बांकीपूरमधून उभे होते. ते 39 हजार 36 मतांनी पराभूत झाले. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे नितीन नवीनने पराभूत केले. नवीन यांनी 83 हजार 68 मते घेतली. तर लव सिन्हा यांना केवळ 44 हजार 32 मते मिळाली.

प्रगतीशील लोकतांत्रिक आघाडीचे उमेदवार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांनाही मधेपुरा विधानसभा मतदारसंघातून पराभूत व्हावं लागलं. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जाणारे पप्पू यादव यांना 26 हजार 462 मते मिळाली. ते तिसऱ्या नंबरवर राहिले. या ठिकाणी राजदचे चंद्रशेखर विजयी झाले.

आरजेडीचे स्टार प्रचारक आणि बाहुबली आनंद सिंह यांची पत्नी लवली आनंद यांनी सुद्धा या निवडणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सहरसा विधानसभा मतदारसंघातून त्या उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात उभे असलेले आलोक आनंद हे दणदणीत मतांनी विजयी झाले. आलोक यांना 1 लाख 3 हजार 538 मते मिळाली. तर लवली यांना 83 हजार 859 मते मिळाली. त्या 19 हजार 679 मतांनी पराभूत झाल्या. मात्र, त्यांचे चिरंजीव चेतन आनंद शिवहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी बुंदेला यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या. त्यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतल्याने बिहारीगंज विधानसभा सीट चर्चेत आली होती. मात्र, भाजपच्या निरंजन कुमार मेहता यांनी त्यांचा पराभव केला. निरंजन कुमार यांना 81 हजार 531 मते मिळाली. तर सुभाषिनी यांना 62 हजार 820 मते मिळाली.

संबंधित बातम्या:

‘नितीशजी तेजस्वीला आशीर्वाद द्या, बिहारमधून बाहेर पडा; भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला’

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना

(Pushpam priya, Pappu yadav, luv sinha loss in Bihar Election)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.