सगळीकडे पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची चर्चा; पण काँग्रेस काय म्हणतेय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) चेअरमन होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (news of sharad pawar as a president is wrong says tariq anwar)

सगळीकडे पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची चर्चा; पण काँग्रेस काय म्हणतेय?

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) चेअरमन होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यावर थेट भाष्य करण्यात आलं नसलं तरी काँग्रेसने मात्र त्यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याच्या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. (news of sharad pawar as a president is wrong says tariq anwar)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पंरतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही, असं अन्वर म्हणाले.

पवारांनाही या चर्चेची माहिती नसेल

पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याचा विषय सोडा, त्याबाबत कोणती चर्चाही झालेली नाही, असं सांगतानाच या बातमीत काहीही तथ्य नाही. खुद्द पवारांनाही अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याचं माहीत नसेल, असं अन्वर यांनी सांगितलं.

यूपीएचा अध्यक्ष काँग्रेसमधूनच

यूपीएचा अध्यक्ष हा सर्वात मोठ्या पक्षातूनच होत असतो. काँग्रेस जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना झाली होती. आजही काँग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे खासदारांचं सर्वाधिक बळ आहे. त्यामुळे यूपीएचा अध्यक्षही काँग्रेसमधूनच होईल यात शंका नाही. आता ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, त्या आम्ही नाकारत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं चेअरमनपद पवारांना दिलं जाऊ शकतं. त्याबाबतची प्राथमिक चर्चाही झाली आहे. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुका आणि हैदराबाद पालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणी होत आहे. राहुल यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादीची सावध प्रतिक्रिया

पवारांकडे यूपीएच्या चेअरमनपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

पवारांकडे नेतृत्व म्हणजे सोनिया गांधींवर अविश्वास

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या चर्चेवर टीका केली आहे. पवारांकडे यूपीएचं नेतृत्व जाणं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. (news of sharad pawar as a president is wrong says tariq anwar)

 

संबंधित बातम्या:

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

(news of sharad pawar as a president is wrong says tariq anwar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI