एकनाश शिंदे गटाला आता थेट ठाकरेंच्या घरातूनच पाठिंबा; बाळासाहेबांचा नातू शिंदेच्या मदतीने राजकारणात एंन्ट्री करणा

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निहार ठाकरे यांचा 2021 मध्ये विवाह झाला. मुंबईत त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला होता.

एकनाश शिंदे गटाला आता थेट ठाकरेंच्या घरातूनच पाठिंबा; बाळासाहेबांचा नातू शिंदेच्या मदतीने राजकारणात एंन्ट्री करणा
वनिता कांबळे

|

Jul 29, 2022 | 8:13 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाश शिंदे(Eknath Shinde) गटाला आता थेट ठाकरेंच्या घरातूनच पाठिंबा मिळाला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे सख्खे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे(Nihar Bindumadhav Thackeray ) यांनी एकनाथ शिंदे यांना दिला पाठींबा दिला आहे. व्यवसायाने वकिल असलेले निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार आहे. निहार ठाकरे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे.

निहार बिंदूमाधव ठाकरे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निहार ठाकरे यांचा 2021 मध्ये विवाह झाला. मुंबईत त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला होता.

निहार ठाकरेंचा वकिली व्यवसायात जम

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहेत.

ठाकरे कुटूंब महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं मोठ नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत. तर त्यांचे चिरंजीव आदित्य हे सक्रिय राजकारणात आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांचा देखील महाराष्ट्र नव निर्माण पक्ष आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील आता राजकारणात उतरले आहेत.

उद्धव ठाकरेंना एकापठोपाठ एक धक्के

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत.

शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ

शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाकडे  शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें