निलेश राणेंच्या कट्टर समर्थकाची मध्यरात्री अज्ञाताने कार जाळली!

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांची इनोव्हा कार अज्ञाताने जाळली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत संजू परब यांची संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच कार जाळपोळीची घटना घडल्याने सिंधुदुर्गाचं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. संजू परब यांच्या कारची जाळपोळ राजकीय वैमनस्यातून घडल्याची …

निलेश राणेंच्या कट्टर समर्थकाची मध्यरात्री अज्ञाताने कार जाळली!

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांची इनोव्हा कार अज्ञाताने जाळली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत संजू परब यांची संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच कार जाळपोळीची घटना घडल्याने सिंधुदुर्गाचं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

संजू परब यांच्या कारची जाळपोळ राजकीय वैमनस्यातून घडल्याची चर्चा सिंधुदुर्गात आहे. मात्र, जाळपोळीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कार ज्या ठिकाणी जाळली गेली, त्या ठिकाणी दारुचे साहित्य, तसेच कॅनचे बुच आढळून आले. त्यामुळे गाडीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून हा जाळपोळीचा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोण आहेत संजू परब?

संजू परब हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्षही आहेत. सावंतवाडी तालुक्याच्या राजकारणात संजू परब हे प्रचंड सक्रीय असतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *