आपली शिवसेना आता सेक्युलर, मर्द असाल तर सांगून टाका, नितेश राणेंचे थेट आव्हान

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:29 PM, 30 Nov 2020
BJP MLA Nitesh Rane take a dig at Shivsena over MLC election Maharashtra 2020 results

मुंबई :  शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने सोमवारी सकाळपासूनच भाजपने टीकेची झोड उठवली. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. (Nitesh rane Attackd on Uddhav Thackeray over Shivsena Azan Competition)

अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?, अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

सोमवारी सकाळपासूनच शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने कडाडून टीका केली. अजान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा दाखल देत शिवसेनेला आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विसर पडलाय, असा बाण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोडला. तर ओवेसींना पण लाजवेल अशी भूमिका शिवसेनेने घेतलीये, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. एकूणच भाजप नेत्यांच्या टीकेच्या प्रतिक्रिया येत असताना आता निलेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच प्रहार केला.

भाजपला कोणत्याही गोष्टीवरुन राजकारण करण्याची सवय

दरम्यान, अजानच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी टीका केली आहे. राजकारण करणाऱ्यांना राजकारण करायचंच असतं. आम्ही कोणताही शब्द वापरला तरी ते राजकारण करतात. हिंदू-मुस्लिमांवर राजकारण करण्याची त्यांची जुनीच सवय. ही सवय जाणार नाही, असं सांगतानाच आमचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असं सकपाळ म्हणाले.

प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो. त्यावर आमचा विश्वास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही देशप्रेमी मुस्लिमांची नेहमीच कदर केली आहे. एवढंच नव्हे तर एका मुस्लिम जोडप्याला त्यांनी ‘मातोश्री’त नमाज पठण करण्याची परवानगीही दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

(Nitesh rane Attackd on Uddhav Thackeray over Shivsena Azan Competition)

संबंधित बातम्या

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका

लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा, अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ