मग केंद्र सरकारला सांगा राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; नितेश राणेंचा टोला

तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray's Konkan visit)

मग केंद्र सरकारला सांगा राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; नितेश राणेंचा टोला
भाजप आमदार नितेश राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 12:22 PM

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s Konkan visit)

नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

राज्याने कोकणाला पॅकेज द्यावे

केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने कोकणाला पॅकेज द्यावे जेणे करून कोकणाला आधार मिळेल. केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती मिळावी सुद्धा. निसर्ग चक्रीवादळावेळी राज्य सरकारने 25 कोटींची मदत जाहीर केली. पण अजूनही एकही दमडी आली नाही. तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, पण ती मदत मिळेल असे मला वाटत नाही, असं सांगतानाच काल मुख्यमंत्री कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळून मुंबईला परत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वाधिक नुकसान झालं तिथं मुख्यमंत्री गेलेच नाही

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? मालवणमध्ये वायरी गावात लोक सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची वाट पाहात होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमिनीवर उतरले, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुळात याला दौरा म्हणू शकता का?, संतप्त सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री एखाद्या भागात येतात तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात. हे दुःख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दुःख पुसणारे नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

लिपस्टिक नव्हे, पावडर दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात फिरत होते. मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा केला का? घराबाहेर पडून स्वतःच्या कपड्याची इस्त्री मोडू न देता ते परत घरी गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा असा दौरा कुणी पहिला नसेल, असं सांगतानाच मी तुमच्याच चॅनलवर म्हणालो होतो की मुख्यमंत्र्यांचा हा दौरा लिपस्टिक दौरा आहे. त्यापेक्षाही भयंकर असा हा पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा, अशी खोचक टीका त्यांनी केली.

आमच्यावरचं प्रेम कमी झालं नसावं

ज्या चिवला बीचवर मुख्यमंत्री उभे राहिले तिथे समोरच राणे साहेबांचे घर आहे. मुख्यमंत्र्यांचं कदाचित आमच्यावरचं प्रेम आजही कमी झालेलं नाही. मुख्यमंत्री खूप दिवस इथे राहिले आहेत. आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना?, असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंकडून काही तरी शिका

कोकणातील जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. पण उद्धवजींनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नात उद्धवजींना कळलं असतं तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धवजींपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. शिंदेंनी किमान कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यामुळे बाळासाहेबांचा मूळ शिवसैनिक कसा असतो हे शिंदेंनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभारच मानेन. त्यामुळे शिंदेंकडून काही तरी शिका, असा माझा मुख्यमंत्र्यांना सल्ला राहीन, असा चिमटाही त्यांनी काढला. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s Konkan visit)

संबंधित बातम्या:

नवाब मलिक आमच्या बुटांबद्दल बोलतात, पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील, दरेकरांचा हल्ला

‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्यासोबत पंतप्रधानांचा भेदभाव नाही; चंद्रकांतदादांनी आरोप फेटाळले

(Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s Konkan visit)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.