नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार, अजित पवारांची माहिती

| Updated on: Sep 25, 2021 | 4:17 PM

नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गाच्या कामाचं भूमीपूजन होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवारसाहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशी नितीन गडकरी यांची इच्छा असल्याचं अजित पवार म्हणाले.

नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार, अजित पवारांची माहिती
नितीन गडकरी, शरद पवार
Follow us on

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रजमध्ये 2 हजार 215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गाच्या कामाचं भूमीपूजन होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवारसाहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशी नितीन गडकरी यांची इच्छा असल्याचं अजित पवार म्हणाले. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. (Nitin Gadkari and Sharad Pawar will be on the same platform)

पुण्यात शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या दरम्यान, बारामती आणि सासवडमध्येही नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी उपस्थित राहावं असा नितीन गडकरी यांचा आग्रह आहे. त्यानुसार लवकरच या कार्यक्रमांचं नियोजन करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

पेट्रोल-डिझेल बंद करणं ही माझी इच्छा

दरम्यान काल पुण्यात बोलताना नितीन गडकरी यांनी एक महत्वाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल आणि फन टाईम थिएटर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. माझी आयुष्यात एकच इच्छा असून ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणं ही आहे. शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात. मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही, असं त्यांना सांगितल्याची माहिती नितीन गडकरींनी म्हटलं. बजाज आणि टीव्हीएसच्या श्रीनिवासन या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं. ब्राझीलमध्ये 100 टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली ती म्हणजे 1 लि. पेट्रोल बरोबर 1 लि इथेनॉल आहे, असंही गडकरींनी सांगितलं.

अजितदादांचा पोलिसांना आपुलकीचा सल्ला

पोलिस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठांनी घेतली पाहिजे. पुण्यात काही अधिकारी तणावात राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. त्यामुळे असे प्रकार घडले नाही पाहिजेत. एकीनं काम करून विषय मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आणि आपुलकीचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘सीएमआयएस’ या वेबसाईट आणि अॅपचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरीचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुण्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिसांनी तणावमुक्त राहून काम करण्याचा सल्ला दिला. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कसलीही तडजोड करु नका, अशी सूचनाही अजित पवारांनी यावेळी दिली.

इतर बातम्या :

ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात का दाखल केला नाही? बावनकुळेंचा सवाल

सावित्रीने शिकवलं, म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचताय, OBC हक्क परिषदेत छगन भुजबळांचा हल्लाबोल

Nitin Gadkari and Sharad Pawar will be on the same platform