सावित्रीने शिकवलं, म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचताय, OBC हक्क परिषदेत छगन भुजबळांचा हल्लाबोल

मी जेलमध्ये असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. माझी तब्येत बरी नसताना त्यांनी खूप मदत केली. ते विधानमंडळात उभे राहिले. आवाज उठवला. या माणसाचा मी शब्द मोडू शकत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

सावित्रीने शिकवलं, म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचताय, OBC हक्क परिषदेत छगन भुजबळांचा हल्लाबोल
Chhagan Bhujbal


जळगाव : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी हक्क परिषदेत (OBC Reservation) तुफान फटकेबाजी केली. ओबीसी आरक्षण का काढलं हे आधी सांगा आणि त्याची भरपाई कशी करणार याची माहिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केलं. शरद पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, देशात सर्वत्र आरक्षण होतं, पण 102 वी घटना दुरुस्ती करताना केंद्र सरकारने काढलं. मग परत त्यांनी राज्यांना अधिकार दिले, पण आधी तुम्ही आरक्षण काढलं का हे सांगा, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी मोदी सरकारकडे केली.

सावित्रीमाईंनी शिकवलं म्हणून अथर्वशीर्ष वाचताय

भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय. फोडा आणि राज्य करा असं भारत सरकार करत आहे. मी कुणाच्या भावनेला हात घालत नाही, दगडूशेठ गणपतीला 50 हजार की 25 हजार आमच्या भगिनी अथर्व, अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हटलं.. किती मोठी बातमी. इथून जवळच सावित्रीबाई फुल्यांनी महिलांसाठी शाळा सुरु केली, ती तेवढ्याच अंतरावर आहे, हाकेच्या अंतरावर आहे. पण अथर्वशीर्ष झाल्यानंतर आपण तिथे जाऊन तिथे डोकं टेकवावं असं कुणालाही वाटलं नाही. जे अथर्वशीर्ष तुम्ही वाचलं, ते वाचलं कसं? तर त्यांनी (सावित्रीमाई फुलेंनी) शिकवलं म्हणून, असं छगन भुजबळ म्हणाले.

बाबासाहेबांनी सर्वांना एकत्र केलं

देशात साडेसात हजार जाती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकत्र बसवले. खुला, ओबीसी, दलित, आदिवासी अशा 4 प्रवर्गात विभागले. सगळे एकत्र आलात तर आपली ताकद दिसेल. उत्तर भारतात ही ताकद दाखवली म्हणून त्यांना हक्क मिळाला. आपल्याला अशी ताकद दाखवावी लागणार आहे.

अथर्वशीर्ष वाचावं कसे, हे ज्यांनी शिकवले त्यांच्यासमोर तुम्हाला नतमस्तक व्हायला जमत नाही? कुणीही आम्हाला मूर्ख बनवत आहेत. खासगी संस्थांमध्येही आरक्षण मिळावे, ही मागणी रास्त आहे. कारण आज सर्व खासगीकरण होत आहे. यात चूक काय? 2006 साली रामलीला मैदानावर समता परिषदेचा मेळावा झाला. तेव्हा काँग्रेसचे मंत्री अर्जुनसिंह यांनी आम्हाला आयआयटीसारख्या संस्थांमध्ये आरक्षण दिले. 2017 पर्यंत ते आरक्षण मिळाले. पण नंतर काढले. तुम्ही आमचं आरक्षण दिले नाही तर तुम्ही ते आधीच काढले होते, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

भाजपवर हल्लाबोल

जो जो या कामात येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावली जाते, ईडी लावली जाते. जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. म्हणून सर्वांनी सावध राहा आणि घाबरले असाल त्यांनी भाजपमध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

आज याठिकाणी सर्व जण अतिशय जोरात आणि तावातावात बोलले. उद्या इन्कम टॅक्स घरी आले नाही म्हणजे झालं.खडसेंनाही आज त्रास होतोय.सावध रहा बरं. जे घाबरले असतील त्यांनी भाजपमध्ये जावं. मग सब माफ होईल.

मी जेलमध्ये असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. माझी तब्येत बरी नसताना त्यांनी खूप मदत केली. ते विधानमंडळात उभे राहिले. आवाज उठवला. या माणसाचा मी शब्द मोडू शकत नाही. शरद पवारांनी देखील मला साथ दिली. त्यांनीही पत्र पाठवले होते. त्यामुळे मला उपचार मिळाले.

भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहेत. धर्मांची अफूची गोळी आज सर्वांवर राज्य करत आहे. मंडल बाहेर आले की लगेच कमंडल बाहेर येते, असं छगन भुजबळ म्हणाले.

मनुवादी प्रवृत्तीला विरोध

तुमच्या सगळ्यांची ताकद असताना भुजबळ कोणालाही घाबरणार नाही. यापुढेही लढत राहणार. संघर्ष आमच्या आयुष्यात भरला आहे. हा संघर्ष गोरगरिबांसाठी आहे. पूर्वीचा इतिहास दाबला गेला. पण महात्मा जोतिबा फुलेंनी त्याला उजाळा दिला. आमचा मनुवादाला विरोध आहे. त्या मनुवादी प्रवृत्तीला विरोध आहे. म्हणूनच या चळवळीची आवश्यकता आहे. विरोधक आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करणार. पण आपल्याला घाबरून चालणार नाही, असा हल्लाबोल भुजबळांनी केला.

VIDEO : छगन भुजबळ यांचा ओबीसी हक्क परिषदेत हल्लाबोल

संबंधित बातम्या  

साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल : नितीन गडकरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI