मी ज्या ज्या चुका केल्या, त्याच तुम्ही केल्या; नितीन गडकरी कुणाला पाहून म्हणाले?

नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये भाजपाचे कार्यकर्ते तसेच नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मी ज्या चुका केल्या, त्याच चुका तुम्ही केल्या, असे गडकरी म्हणाले.

मी ज्या ज्या चुका केल्या, त्याच तुम्ही केल्या; नितीन गडकरी कुणाला पाहून म्हणाले?
nitin gadkari
| Edited By: | Updated on: Apr 06, 2025 | 12:01 PM

Nitin Gadkari : आपल्याला जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळाली आहे. या पक्षाची स्थापना करताना काही उद्दिष्टं आपण बाळगली होती. ती उद्दीष्ट पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो. या कार्यालयासाठी कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचं कार्यालय आपण विकत घेतलं. गिरीश व्यास यांनी जागा दिली, असे गडकरी बोलताना म्हणाले.

सगळेजण मुलासाठी तिकीट मागतात, मी माझ्या मुलाचा…

तसेच, मुर्ख लोक घर बांधतात आणि शहाने लोक किरायाने राहतात. याचा उत्तम अनुभव या कार्यालयाच्या जागेतून किरायेदार खाली करताना आला. कार्यलय हे भाजपचं घर आहे, असं गडकरी म्हणाले. तसेच नेत्यांचं आपल्या प्रेम मुलांवर असतं. सगळेजण मुलासाठी तिकीट मागतात. मी माझ्या मुलाचा आग्रह धरत नाही. त्यामुळे अनेकांची पंचायत होते. नेत्यांनी आपल्या मुलाप्रमाणे कार्यकर्यांवर प्रेम करावं. नेत्यांनी कार्यकर्त्यांना गुण-दोषासह स्वीकारावे. या कार्यालयात माणूसपण कायम रहावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मी ज्या ज्या चुका केला त्या…

तसेच, जुण्या आठवणी सांगाताना ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळात आम्ही या (भाजपा कार्यालयाचा) ईमारतीचा किराया दिला नाही. असंख्य कार्यकर्त्यांच्या बलीदानातून आज आपल्याला हा दिवस पहायला मिळाला. याची जाणीव आजच्या कार्यकर्त्यांना व्हायला हवी. मी बावनकुळे यांना सांगितली, मी ज्या ज्या चुका केला त्या तुम्ही केल्या. जातीचे सेल उघडून फायदा नाही. जातीचे सेल करुन कुठल्या जाती जुळल्या नाही. ज्या जातीच्या नेत्याला आपण घेतलं, त्या लोकांना त्या जातीने स्वीकारलं नाही. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या म्हणून लोक येतील, तेव्हा बावनकुळे यांना कळेल. माझ्यावर हे बेतले होतं, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

मी 25 लाखांचा चेक पाठवतो

“भाजपचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे. हे कार्यालय सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल यासाठी प्रयत्न करावा. आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला, की कार्यालयासाठी चेक ने पैसे द्यावे. आता चेकपेक्षा कॅश ने लोक पैसे देण्यावा पसंती देतात. चेक ने पैसे द्यावे याचा अर्थ कमाईतला हिस्सा द्यावा. मी 25 लाखांचा चेक पाठवतो, अशी घोषणाही त्यांनी केली.