NMC Election 2022 : नागपूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2मध्ये काँग्रेसचा दबदबा! जागा राखण्याचं आव्हान
Nagpur municipal corporation election 2022 : नागपूरचा वॉर्ड क्रमांक 2 हा काँग्रेसचा 2017 साली काँग्रेसने जिंकला होता.

नागूपर : 2017 साली नागपूर महानगर पालिकेवर (NMC election 2022) भाजपचा झेंडा फडकला. भाजपच्या नगरसेवकांनी बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकत आपला दबदबा नागपूरमध्ये कायम ठेवला होता. असं असलं तरी नागपूरच्या वॉर्ड क्रमांक दोनचं राजकीय गणित आणि इतिहास वेगळा आहे. नागपूर प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे. 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये (Nagpur municipal corporation election 2022) भाजपचे सर्वाधिक नगरसेवक जरी निवडून आले असले, तरी पालिका 2017 सालच्या पालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले चारही नगरसेवक नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणून आणण्याची किमया करुन दाखवली होती. आता पुन्हा हीच किमया करायला काँग्रेसला जमणार का? हेही पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडीमध्ये निवडणूक (Nagpur corporation election) लढवणार, हेही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
दरम्यान, 2017 सालच्या महानगरपालिका निवडणुकीतमध्ये काँग्रेस हा नंबर दोनचा पक्ष राहिला होता. तर भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडणून आणले होते. राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर निवडून आले होते. तर शिवसेनेचा दोन जागांवर विजय झालेला होता.
दरम्यान, आता 2022 च्या निवडणुकीत नेमकं काय घडतं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यातच पालिकेच्या रचनेत बदल झाला आहे. वॉर्डची संख्या, आरक्षण या गोष्टीतही बदल झालेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचा परिणाम निकालावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या पालिका निवडणुकीत नागपुरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये चारऐवजी फक्त तीन वॉर्ड असणार आहे. त्यामुळे हा प्रस्थापितांसाठी धक्का मानला जातोय.
नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 2
प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3
प्रभाग क्रमांक 2 : आरक्षण पुढीलप्रमाणे
- प्रभाग क्रमांक 2 अ : अनुसूचित जाती महिला
- प्रभाग क्रमांक 2 ब : सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक 2 क : सर्वसाधारण
2017 साली निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची नावे
- प्रभाग क्रमांक 2 अ : भावना संतोष लोणारे 11448 काँग्रेस
- प्रभाग क्रमांक 2 ब : दिनेश बसंतीलाल यादव 9928 काँग्रेस
- प्रभाग क्रमांक 2 क : नेहा राकेश निकोसे 10013 काँग्रेस
- प्रभाग क्रमांक 2 ड : मनोज दशरथ सांगोले 13137 काँग्रेस
नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 2 अ
| उमेदवार | विजयी/आघाडी | |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 2 ब
| उमेदवार | विजयी/आघाडी | |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
नागपूर महानगर पालिका 2022 प्रभाग क्रमांक 2 क
| उमेदवार | विजयी/आघाडी | |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
प्रभाग क्रमांक 2 : लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या 48442
- अनुसूचित जाती 22393
- अनुसूचित जमाती 1461
2017 सालचा नागपूर महानगर पालिकेचा निकाल
- एकूण जागा 151
- भाजप 108
- काँग्रेस 29
- बीएसपी 10
- शिवसेना 2
- राष्ट्रवादी काँग्रेस 1
- अपक्ष 1
कोणता भाग मोडतो
नागपूर प्रभाग क्रमांक दोनमध्ये दिक्षितनगर, बाबदिपसिंगनगर, रमाईनगर, कामगारनगर, कपीलनगर, के.सी.एन. सोसायटी, नारी, समतानगर, कुशीनगर, डब्लुसीएल कॉलनी हा भाग मोडतो. या भागातील जनता 2022च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला मत देणार की नाही, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी राजकीय घडामोडी काय घडतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
