AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ?

राज ठाकरे यांनी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, मात्र मनसेच्या या यादीत वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाही.

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ?
Raj Thackeray Aaditya Thackeray
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 02, 2019 | 8:48 AM
Share

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. वरळीतून रिंगणात उतरत जनतेतून निवडून येणारा ‘पहिला ठाकरे’ होण्याचा मान पटकवण्याच्या तयारीत आदित्य ठाकरे आहेत. अशा वेळी आदित्य यांचे काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (No MNS Candidate in Worli) यांची अप्रत्यक्ष साथ त्यांना लाभणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे. 27 उमेदवारांची पहिली यादी मनसेने जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत वरळीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची (No MNS Candidate in Worli) शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पुरोगामी पक्षाच्या आघाडीच्या वतीने तगडा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

खरं तर, सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. याची जाण ठेवत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यास शरद पवार सकारात्मक नव्हते. मात्र लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव करणारा शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे अजित पवार हे काकांच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं म्हटलं जात होतं.

आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी असलेले सचिन अहिर शिवसेनेत सामील झाल्यामुळे वरळीतून लढताना आदित्य ठाकरेंच्या बाहूत अधिक बळ आलं आहे. मनसेनेही तलवार म्यान केल्यास मराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळतील, यात शंका नाही. त्यातच गुजराती आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंनी अमराठी भाषिकांनाही वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. परंतु उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर बंडोबांना शांत करत असल्यामुळे लेकाच्या ऐतिहासिक घोषणेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकले नाहीत.

दरम्यान, माहिम मतदारसंघातून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कट झाला आहे. या ठिकाणी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवडीतून तीन वेळा आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांचंही यादीत नाव नाही. आपल्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं नांदगावकर म्हणाले आहेत.

Follow Us
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत