AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक : आदेश बांदेकर

कर्जमाफीसाठी फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला, तरी बऱ्याच प्रश्न मार्गी लागतील," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar comment on waiver)  यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक : आदेश बांदेकर
| Updated on: Nov 27, 2019 | 10:20 PM
Share

मुंबई : “केंद्रानेसुद्धा महाराष्ट्राने पाठवलेल्या फाईल्स या तातडीने मंजूर करुन पाठवल्या पाहिजेत. त्यासाठी केंद्राचा सुद्धा हातभार या ठिकाणी लागणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला, तरी बऱ्याच प्रश्न मार्गी लागतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar comment on waiver)  यांनी दिली.

“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण त्यासोबतच केंद्राचीही जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्रानेसुद्धा महाराष्ट्राने पाठवलेल्या फाईल्स तातडीने मंजूर करुन पाठवल्या पाहिजेत. त्यासाठी केंद्राचा हातभार या ठिकाणी लागणे आवश्यक आहे.” असेही आदेश बांदेकर म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही सूडबुद्धीने वागणार नाही, कारण ती वृत्ती नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारं आपलं स्वतंच वाटणारे, प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला, सामान्य नागरिकाला हे सरकार माझं आहे असं प्रत्येकाला वाटेल,” असा विश्वासही आदेश बांदेकरांनी व्यक्त (Aadesh Bandekar comment on waiver) केला.

“तसेच फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.” असेही ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने माझ्या मनात खूप आनंद आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जी इच्छा होती ती इच्छा उद्या शिवतीर्थावर पूर्ण होणार आहे.” असेही बांदेकर म्हणाले.

“उद्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे. ही प्रत्ये शिवसैनिकासाठी आनंद देणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक माणूस हा आनंदी व्हावा हे पहिल्यापासून शिवसेनेचे धोरण आहे.” असेही ते (Aadesh Bandekar comment on waiver) म्हणाले.

“अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवरचे प्रत्येक संकट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीवर विश्वासादर्शक हात असू द्या. हे सर्व उद्धव ठाकरे समजून घेत होते. प्रत्येक वेळा शेतकऱ्यांनी ज्या वेदना मांडल्या होत्या त्यांना न्याय मिळावा. तो न्याय आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या माध्यामातून मिळतो आहे. शेतकऱ्यांची कामे पूर्ण होतील हा विश्वास त्यांना वाटू लागला आहे.” असेही आदेश बांदेकर म्हणाले.

ठाकरेंचा ग्रँड शपथविधी

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार निश्चित झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत.

मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.

शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.