मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसने नाही, ‘नोटा’ने हरवलं!

मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसने नाही, 'नोटा'ने हरवलं!

भोपाळ : तब्बल 15 वर्षानंतर एखाद्या राज्याचा प्रमुख म्हणून पद सांभाळल्यानंतर त्या पदावरुन पायउतार होणं काय असतं त्याचा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलाय. शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवत सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यामुळे आपण सत्तेचा दावा करणार नाही, असं ते म्हणाले. मध्य प्रदेशातील […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:52 PM

भोपाळ : तब्बल 15 वर्षानंतर एखाद्या राज्याचा प्रमुख म्हणून पद सांभाळल्यानंतर त्या पदावरुन पायउतार होणं काय असतं त्याचा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलाय. शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवत सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यामुळे आपण सत्तेचा दावा करणार नाही, असं ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील भाजपचा पराभव पक्षाच्या किती जिव्हारी लागलाय, हे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सादर केलेल्या एका कवितेतून दिसून आलं. अत्यंत भावूक प्रतिक्रिया देत त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. “ना हार में, ना जीत मे, किंचित नही भयभित मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही” या ओळीतून शिवराज सिंहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी भाजपच्या पराभवाला काँग्रेस कारणीभूत ठरलेली नाही. भाजपचा पराभव नोटा या पर्यायामुळे झाल्याचं आकडेवारीतून दिसून येतंय. भाजपचे अनेक उमेदवार एक हजार ते दोन हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर दुसरीकडे नोटाला लाखो मतं मिळाली आहेत. म्हणजेच भाजपच्या पारंपरिक मतदाराने काँग्रेसला मतदान करण्याऐवजी नोटाचा पर्याय निवडला.

शेतकरी धोरण असेल किंवा महागाई, अनेक मुद्द्यांमुळे देशभरात सध्याच्या सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदारही नाराज आहे. हा मतदार काँग्रेसला मतदान करत नसला तरी भाजपलाही मतदान करत नाही हे निकालातून दिसून येतंय.

नोटाला किती मतं?

मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून दूर आहे. शिवाय भाजपच्या तुलनेत काँग्रेसला मतंही कमी मिळाली आहेत. पण कमी मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा विजय झाल्यामुळे भाजपचं चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं. काँग्रेसला 40.9 टक्के मतदारांनी मतदान केलंय, तर भाजपला 41 टक्के मतदारांनी पसंती दिली. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात नोटा (None of the above) या पर्यायाला 1.4 टक्के मतं मिळाली आहेत.

भाजपला मध्य प्रदेशात 15642980 मतदारांनी पसंती दिली. तर काँग्रेसला 15595153 मतं मिळाली. म्हणजेच भाजपच्या तुलनेत काँग्रेसला 47 हजार 827 मतं कमी मिळाली. विशेष म्हणजे नोटा या पर्यायाला 5 लाख 42 हजार 295 मतदारांनी पसंती दिली. म्हणजेच मध्य प्रदेशातील 1.4 टक्के मतदारांनी एकाही उमेदवाराला मत दिलं नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें