Maharashtra Political Crisis : आता फक्त 48 तास… भाजप नेते अतुल भातखळकरांचं सूचक ट्विट, जाणून घ्या 3 शक्यता

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या सगळ्या राजकीय घडामोडीदरम्यान एक महत्वपूर्ण ट्विट केलंय. यामुळे भातखळकर यांच्या ट्विटचे देखील वेगवेगळे अर्थ काढले जातायत. आता भाजपनेते अतुल भातखळकर यांनी काय ट्विट केलंय, ते आधी जाणून घेऊया.

Maharashtra Political Crisis : आता फक्त 48 तास... भाजप नेते अतुल भातखळकरांचं सूचक ट्विट, जाणून घ्या 3 शक्यता
भातखळकर यांचं सूचक ट्विटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:13 AM

मुंबई :  राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटामुळे अडचणीत आलंय. यामुळे राज्यपालांनी मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.  तर दुसरीकडे या बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालंय. तर दुसरीकडे भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या सगळ्या राजकीय घडामोडीदरम्यान एक महत्वपूर्ण ट्विट केलंय. यामुळे भातखळकर यांच्या ट्विटचे देखील वेगवेगळे अर्थ काढले जातायत. आता भाजपनेते अतुल भातखळकर यांनी काय ट्विट केलंय, ते आधी जाणून घेऊया. त्यानंतर त्याच्या तीन शक्यता काय आहे तेही पाहूया…

अतुल भातखळकरांनी काय ट्विट केलंय?

महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना. सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आलेला असताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आता फक्त 48 तास…’ असं लिहिलं असून त्यावरुन राज्यातील जाणकार वेगवेगळ्या बाजूने याकडे बघतायत.

अतुल भातखळकरांचं ट्विट

सूचक ट्विटच्या 3 शक्यता

  1. मविआ फ्लोअर टेस्ट हरणार? – भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीवर पत्र दिलं. त्यानंतर राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ते बहुमत मविआ सरकारला उद्या सामोरं जाईल. त्यामुळे ‘फक्त चोवीस तास’ हे विधान मविआ सरकारसाठी असल्याचंही बोललं जातंय.
  2. नवं सरकार स्थापन होणार? – 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर 1 जुलै रोजीच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठीच्या हालचाली भाजपकडून सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे. हा मुद्दा धरून भातखळकरांच्या ट्विटकडे जाणकार पाहतायत.
  3. भाजप-शिवसेना युती?-या सगळ्या घडामोडी होत असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा, या प्रस्तावावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊन मविआतून बाहेर पडू शकतात, अशी शक्यता देखील व्यक्त केली जातेय. यामुळे सरकार पडू शकतं, अशीही शक्यता या सूचक ट्विटबाबत असल्याचं जाणकार सांगतात.

दिल्लीतून फडणवीस मुंबईत, रात्री राजभवनात

काल दुपारी देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर रात्री ते मुंबईत परतल्यानंतर सागर बंगल्यावर राज्यातील भाजप नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर सर्व नेते रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राजभवनावर गेले. यावेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिवसेनेचे 39 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ते राहू इच्छित नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. त्यानुसार आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी म्हणजेच उद्या 30 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.