AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake : ‘मी शरद पवार साहेबांकडे गेलो होतो, त्यांनी तिकीट…’ काय म्हणाले लक्ष्मण हाके?

Laxman Hake : "अर्थसंकल्पात ओबीसीला 1% पैसे देत आहेत. मग आम्हाला काय मिळालं आहे? महारष्ट्रात एकही ओबीसी वसतिगृह नाही. सरकारने सहकारी साखर कारखान्यांना पैसे दिले. ओबीसींना अर्थसंकल्पात काय दिलं?" असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.

Laxman Hake : 'मी शरद पवार साहेबांकडे गेलो होतो, त्यांनी तिकीट...' काय म्हणाले लक्ष्मण हाके?
LAXMAN HAKE
| Updated on: Jul 06, 2024 | 2:29 PM
Share

“मराठा बांधवांवर बेरोजगाराची वेळ आली. नोकरी नाही. याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. तुम्ही ओबीसी झाले तर गरीबी हटणार हे कोणी सांगितले तुम्हाला?” असा सवाल OBC आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विचारला. “संविधानाला आव्हान देण्याची भाषा करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील नेते पाच वर्ष निवडणूक मोड मध्ये व्यस्त असल्याने प्रश्न सुटत नाही. सामजिक व्यवस्था बिघडत आहे. आजही महाराष्ट्रातील ओबीसी सामजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

“म्हणून आम्ही वडीगोद्रित आंदोलन केले. उपोषणाला बसलो. जरांगे पाटील म्हणतात, आम्ही खूप काही खाल्ले. पण अर्थसंकल्पात ओबीसीला 1% पैसे देत आहेत. मग आम्हाला काय मिळालं आहे? महाराष्ट्रात एकही ओबीसी वसतिगृह नाही. सरकारने सहकरी साखर कारखान्यांना पैसे दिले. ओबीसींना अर्थसंकल्पात काय दिलं?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला. “याआधी इतर ठिकाणीं अनेक ओबीसी आंदोलनं झाली. मात्र शासनाने लक्ष दिलें नाहीं. म्हणून आम्ही शासनाचे आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वडीगोद्रीत आंदोलन केले” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

‘किमान 50 पोरं आमची विधानसभेत गेली पाहिजेत’

“याआधी ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत. आताच्या नेत्यांनी तसं एकत्रित यायला हवं. आमचे लोक विधानसभेत गेले तर आवडेल. किमान 50 पोरं आमची विधानसभेत गेली पाहिजेत. आमच्या समाजाच प्रतिनिधीत्व करायला आत जायला हवं. भकोचा DNA ओबीसी असेल तर पुढं या” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “जी भूमिका संविधानाला धरून असेल, कायद्याला धरून असेल ती मांडा. धनगर समाजाचा एकही खासदार आज संसदेत नाही हे वाईट आहे. समाजाला प्रतिनिधीत्व द्यायला हवं. सामाजिक समतोल राहिला पाहिजे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

‘माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते’

“लोकसभेच्या वेळी मी शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी तिकीट फायनल पण केलं होतं, पुढे काय झालं माहिती नाही. हे खरय की, मला केवळ 5 हजार मत पडली. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता. मी तुलना करत नाही, पण उदहारण देत आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.