Odisha Cabinet: ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, राज्यपालांकडे काल सर्वांनी एकत्रच दिला होता राजीनामा

या सरकारने 29 मे रोजी आपल्या पाचव्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली होती, मात्र हा मंत्रिमंडळाचा हा फेरबदल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी म्हणून मंत्रिमंडळ फेरबदलाकडे पाहिले जात आहे.

Odisha Cabinet: ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, राज्यपालांकडे काल सर्वांनी एकत्रच दिला होता राजीनामा
महादेव कांबळे

|

Jun 05, 2022 | 3:02 PM

नवी दिल्लीः ओडिशातील सर्व मंत्र्यांच्या मोठ्या फेरबदलानंतर नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. या शपथ सोहळ्यांमध्ये बीजेडी (Biju Janta Dal) नेते जगन्नाथ सारका आणि निरंजन पुजारी यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक (Chief Minister Naveen Patnaik) यांच्या उपस्थितीत भुवनेश्वर येथील लोकसेवा भवनाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 21 मंत्री, 13 कॅबिनेट आणि 8 स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सरकारने 29 मे रोजी आपल्या पाचव्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली होती, मात्र हा मंत्रिमंडळाचा हा फेरबदल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी म्हणून मंत्रिमंडळ फेरबदलाकडे पाहिले जात आहे. यापूर्वी राज्यातील सर्व मंत्र्यांनी ओडिशा विधानसभेच्या (Odisha Assembly) अध्यक्षांकडे राजीनामे दिले असल्याचे बोलले जात आहे.

यांचा आहे समावेश

जगन्नाथ सारका, निरंजन पुजारी, रणेंद्र प्रताप स्वेन, प्रमिला मलिक, उषा देवी, प्रफुल्ल कुमार मलिक, प्रताप केसरी देब, अतनु सब्यसाची नायक, प्रदीप कुमार मलिक, नबा किशोरी दास, अशोक चंद्र पांडा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तरशपथ घेतलेल्या बीजेडी आमदारांचा समावेश आहे. त्याबरोबरच टुकुनी साहू आणि राजेंद्र ढोलकिया यांचाही या मंत्रिमंडळात समावेश आहे.

कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शपथविधी

समीर रंजन दास, अश्विनी कुमार पात्रा, प्रितिरंजन घडाई, श्रीकांत साहू, तुषारकांती बेहेरा, रोहित पुजारी, रिता साहू आणि बसंती हेमब्रम यांचा स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्रिपदाची शपथ घेणारे नेते आहेत. लोकसेवा भवनाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारचा हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मंत्रिपदाची सेकंड टर्म

दोन वेळा आमदार राहिलेल्या सारका मंत्री झाले आहेत, जगन्नाथ सारका हे शपथ घेणारे पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. ते आमदार म्हणून दोन वेळा निवडून आले असून त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पाच वेळा आमदार राहिलेले बीजेडीचे ज्येष्ठ नेते निरंजन पुजारी यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. त्यांच्याशिवाय अथागढचे आमदार रणेंद्र प्रताप स्वेन, माजी सरकारी प्रमुख प्रमिला मलिक, चिकीतीच्या आमदार उषा देवी, औलचे आमदार प्रताप देब, महाकालपाडा आमदार अतनु सब्यसाची नायक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नवीन पटनायक सरकारच्या मंत्रिमंडळात नायक आठ वर्षांनी पुन्हा मंत्रिमंडळात परतले आहेत.

ज्येष्ठ नेते आणि बौधचे आमदार प्रदीप आमट यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय झारसुगुडाचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री नाबा दास हे देखील कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

यांना मिळाली बढती

एकमरा-भुवनेश्वरचे आमदार अशोक चंद्र पांडा यांना यावेळी मंत्रिमंडळात बढती देण्यात आली आहे. तितलाघाटचे आमदार तुकुणी सागू यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. नौपाड्याचे तीन वेळा आमदार राहिलेले राजेंद्र ढोलकिया कॅबिनेट मंत्री झाले असून निमापाड्याचे आमदार समीर रंजन दास स्वतंत्र प्रभार घेऊन मंत्री झाले आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें