महाराष्ट्राची चिंता वाढली! परदेशातून आलेल्या 485 जणांची चाचणी, 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनबाबत तपासणी होणार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) आज 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) करण्यात आली होती. त्यापैकी जणांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 28 जणांचे अहवाल जनुकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्राची चिंता वाढली! परदेशातून आलेल्या 485 जणांची चाचणी, 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनबाबत तपासणी होणार
किशोरी पेडणेकर

मुंबई : भारतात कोरोनाचा नवा प्रकार (Corona New Variant) असलेल्या ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाल्यानं सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. अशावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) आज 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) करण्यात आली होती. त्यापैकी जणांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 28 जणांचे अहवाल जनुकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातील 12 नमुने एनआयव्हीकडे तर 16 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आज परदेशातून आलेल्या आणि निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या 485 जणांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर त्यांचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच हे प्रवासी कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचीही माहिती मिळवली जात असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.

मुंबईला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरु- महापौर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार 3 हाय रिस्क देश आहेत. तिथून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी आणि जिनोम सिक्वेन्शिंग केली जाणार आहे. देशांतर्गत विमानाने येणाऱ्यांसाठी लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मुंबईत विमानतळावर नियमांचं पालन करण्यात येणार असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं. तसंच कर्नाटक सीमा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही त्या म्हणाल्या.

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

भारतासह तब्बल 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव

जगातील 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला असून एकूण 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एका अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो. आम्ही जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमधील वाढ पाहत आहोत. त्यात युरोपचा वाटा 70 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?

Nawab Malik: कितीही स्वप्न पाहा, गांधीनगर नव्हे, मुंबईच आर्थिक राजधानी राहणार; नवाब मलिकांचा भाजपला टोला

Published On - 10:44 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI