AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन भारतवर्ष’: भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा खुलासा, 18 खासदारांचा भांडाफोड

नवी दिल्ली : टीव्ही 9 भारतवर्ष आज दिवसभर ‘ऑपरेशन भारतवर्ष’ अंतर्गत भारतीय राजकारणातील अनेक बड्या चेहऱ्यांचा भांडाफोड करत आहे. यामध्ये पैशाच्या जोरावर भारतीय निवडणुकांना प्रभावित करत लोकशाहीला बाधा पोहोचवणाऱ्या नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन दाखवले जात आहे. टीव्ही 9 भारवर्षच्या ऑपरेशन भारतवर्षमध्ये देशभरातील 18 खासदारांचा भांडाफोड करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे. देशाचे भविष्य ठरवणाऱ्या […]

‘ऑपरेशन भारतवर्ष’: भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा खुलासा, 18 खासदारांचा भांडाफोड
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

नवी दिल्ली : टीव्ही 9 भारतवर्ष आज दिवसभर ‘ऑपरेशन भारतवर्ष’ अंतर्गत भारतीय राजकारणातील अनेक बड्या चेहऱ्यांचा भांडाफोड करत आहे. यामध्ये पैशाच्या जोरावर भारतीय निवडणुकांना प्रभावित करत लोकशाहीला बाधा पोहोचवणाऱ्या नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन दाखवले जात आहे. टीव्ही 9 भारवर्षच्या ऑपरेशन भारतवर्षमध्ये देशभरातील 18 खासदारांचा भांडाफोड करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे.

देशाचे भविष्य ठरवणाऱ्या निवडणुकांवर देशवासियांचे लक्ष लागलेले असताना राजकीय नेत्यांकडून मात्र निवडणुका प्रभावित करण्यासाठी काळ्या पैशांचा उपयोग केला जात आहे. पैशाच्या जोरावर मते खरेदी करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करुन गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोकही लोकप्रतिनिधी होत आहेत. त्यांच्या या कृत्याची कबुली ते स्वतः देताना पाहायला मिळत आहेत. एक नाही दोन नाही, तर तब्बल 18 खासदारांचा खरा चेहरा टीव्ही 9 भारतवर्षच्या गुप्त कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टीव्ही 9 भारतवर्षवर दिवसभर खासदारांच्या घरी सुरु असलेल्या काळ्या पैशाच्या हेराफेरीचा पर्दाफाश करत आहे. तसेच संसदेचे स्टिकर लावलेल्या गाड्यांमधून काळ्या पैशांचे कसे व्यवहार होतात हेही चव्हाट्यावर आणत आहे. नोटबंदीनंतरही खासदार भरभरुन काळ्या पैशाचा पाऊस कसा पाडत आहेत? या प्रश्नाचेही उत्तर या स्टिंगमधून मिळत आहे. खासदार पैसे घेऊन संसदेत काहीही प्रश्न विचारण्यास तयार होत आहेत. नेते उत्तरपासून दक्षिणपर्यंत आणि पूर्वपासून पश्चिमपर्यंत दारु वाटप करुन, पैसे वाटून, गाड्या-टीव्ही-लॅपटॉप भेट देऊन मते खरेदी करत असून विजयीही होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

ऑपरेशन भारतवर्षमध्ये भांडाफोड झालेले 18 खासदार आणि त्यांचे खुलासे:

खासदार रामदास तडस (भाजप, महाराष्ट्र)

  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन
  • डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले
  • पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मी तयार
  • निवडणुकीसाठी 5 कोटी मिळाले
  • पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात
  • नोटाबंदीचा काळ्या पैशावर कसलाही फरक पडला नाही

खासदार पप्पू यादव (भाजप, बिहार)

  • निवडणूक निधीच्या बदल्यात काहीही मदत करण्यास तयार
  • पैशाच्या बदल्यात संसदेत हवा तो प्रश्न विचारण्यास तयार
  • निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठीच्या खर्चाची मर्यादा 70 लाख असताना 2014 मध्ये 5 कोटी रुपये खर्च
  • मतदारांना वाटले 2.5 कोटी रोख रक्कम
  • 2019 च्या निवडणुकीत 8 कोटी खर्च करण्याचा मनोदय
  • बिहारमध्ये दारुबंदी असतानाही दारु वाटप
  • प्रचारासाठी रथ आणि हेलिकॉप्टरचीही मागणी
  • खासदार निवासावर रोख रकमेचे व्यवहार
  • राजकारण सेवा धर्म नाही

खासदार साधू सिंग (आप, पंजाब)

  • निवडणूक आयोगाची प्रचारासाठी 70 लाख रुपयांची मर्यादा असताना 2014 मध्ये 2 कोटी रुपये खर्च
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 कोटी रुपये खर्चाची तयारी
  • चेकद्वारे अडचण असल्याचे सांगत रोख रकमेची मागणी
  • आधी आप आंदोलन होते, आता राजकीय पक्ष
  • मतविभाजन करण्यासाठी डमी उमेदवारही उतरावे लागतात
  • बूथ व्यवस्थापनात सर्वाधित खर्च
  • पैशांच्या जीवावर मतदारांचा व्यवहार

खासदार उदित राज (भाजप, दिल्ली)

  • रोख रक्कम घेण्यात कोणतीही अडचण नाही
  • निवडणुकीचा अर्थ रोख पैसे
  • राजकारणात कोणीही प्रामाणिक नाही
  • 2014 च्या निवडणुकीत 5 कोटी रुपये खर्च
  • नोटबंदी, जीएसटीने देशाला उद्ध्वस्त केले
  • व्यवसायिक देश सोडून पळत आहेत

बहादुर सिंह कोली (भाजप, राजस्थान)

  • 2-3 कोटी रुपये काळा पैसा खर्च करतात
  • गाडी आणि दारुवर लाखो रुपयांचा काळा पैसा उडवला जातो
  • काळ्या पैशातूनच समर्थक आणि प्रचारकांच्या दारु आणि जेवणाचा खर्च
  • मतदानाआधी गाड्यांची संख्या वाढवत निवडणूक आयोगाची फसवणूक
  • पंतप्रधान मोदींच्या सभेला गर्दीसाठी 10-10 लाख रुपये दिले होते
  • पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मिळालेली बरिच रक्कम नेत्यांनी हडपली
  • मतदारांना आणण्यासाठी प्रत्येक बूथवर 5,000 रुपयांचा खर्च
  • निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडून 50 लाख रुपये काळा पैसा मिळतो
  • हवालाच्या माध्यमातून काळा पैसा सहज आणता येतो
  • निवडणूक खर्चासाठी रुग्णवाहिकेतून काळा पैसा मागवला जातो
  • दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते लोकसभा क्षेत्र असा पैसा पोहचतो
  • पोलिसांच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांमध्ये काळा पैसा मागवला जातो
  • संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कोणतेही पैसे घेत नाही

खासदार रामचंद्र पासवान (लोक जनशक्ती पक्ष, बिहार)

  • खर्चाची कोणतीही मर्यादा नाही. समस्तीपूरमधून मागील निवडणुकीत 5 ते 10 कोटी खर्च आला होता
  • संसदेत कंपनीच्या गरजेप्रमाणे प्रश्न विचारण्यासही तयार. पक्षातर्फे प्रश्न विचारतो. तसेच कंपनीला सरकारतर्फे निधीही देण्याची ग्वाही
  • चेकमध्ये अडचणी येतात, रोख पैसे द्या ते सोपे आहे
  • पैसा एकाच वेळी जाणार नाही. विश्वासू माणसाच्या मार्फत पैसे पोहचवणार
  • रोख पैसे असतील तर वेळ लागत नाही, मग दिल्ली असो की काहीही. लवकर व्यवस्था करता येते
  • उमेदवारांना रोख स्वरुपात पैसे दिले जातात
  • पैसे ने-आण करण्यासाठी कार्यकर्ते तयार असतात. हवालामध्ये अडचणी येतात. लाखों गरीब लोक दिल्लीला येतात. या लोकांकडे 2 लाख, 5 लाख, 10 लाख देऊन पाठवले जातात

खासदार एम. के. राघवन (काँग्रेस, केरळ)

  • एम. के. राघवन निवडणुकीत विजय होण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करतात
  • निवडणुकीच्या काळात दारु आणि गाड्यांवर लाखो रुपये खर्च
  • दिल्लीतून पक्ष 2 कोटी रुपये देतो

व्हिडीओ पाहा:

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.