मोदींना हटवण्यासाठी विरोधक एकवटले, पवारांच्या दिल्लीतल्या घरी बैठक

मोदींना हटवण्यासाठी विरोधक एकवटले, पवारांच्या दिल्लीतल्या घरी बैठक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकजूट झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक झाली, ज्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते. एक कॉमन अजेंडा प्रोग्राम ठरवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. ही जबाबदारी राहुल गांधींवर देण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.

बैठकीनंतर शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींना सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

राज्यात परिस्थिती वेगळी असली तरी केंद्रात मोदी सरकारविरोधात एकत्र येणार असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रादेशिक स्तरावर भाजपला टक्कर देत केंद्रापर्यंत पोहोचण्याचं नियोजन विरोधकांनी केलं आहे.


Published On - 10:19 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI