AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकिंग! शपथपत्र घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट, बनावट शपथपत्रांबाबत मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंच्या समर्थनात आहोत, असं सांगणारी अनेक शपथपत्र एका ठिकाणी आढळल्यानं खळबळ! शपथपत्र बनावट असल्याचा शिंदे गटाचा आरोप

ब्रेकिंग! शपथपत्र घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट, बनावट शपथपत्रांबाबत मोठा निर्णय
महत्त्वाची घडामोडImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 10, 2022 | 8:22 AM
Share

शरद पालवे, TV9 मराठी, मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा असल्याची अनेक शपथपत्र (Affidavit) एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाने ही शपथपत्र बनावट असल्याचा आरोप केला. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) वर्ग करण्यात आलं आहे.

स्टॅम्प पेपरचा वापर करुन शपथपत्र बनवली होती. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत एका व्हिडीओ मेसेजद्वारे सनसनाटी आरोपदेखील केला होता. दरम्यान, आता गुन्हे शाखेच्या तपासातून या शपथपत्रांबाबत नेमका काय खुलासा केला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नोटरी करण्यांनीच शपथपत्र बनवल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

पाहा व्हिडीओ :

4,682 बनावट शपथपत्र?

अज्ञात व्यक्तीविरोधात निर्मल नगर पोलिसांनी बनावट शपथपत्र प्रकरणी एफआयआर दाखल करुन घेतली होती. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी याबाबत गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटावर केला होता. तब्बल 4 हजार 682 बनावट शपथपत्र आढळून आली असून याप्रकरणी गंभीर स्वरुपाची कायदेशी कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अख्खी शिवसेना फुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रांची मोहीमच राबवली होती. आम्ही निष्ठावंत, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, अशा आशयाची शपथपत्र शिवसैनिकांकडून गोळा केली जात होती. दरम्यान, त्यातील 4 हजार पेक्षा जास्त शपथपत्रांबाबत आता शंका घेतली जातेय.

पाहा नरेश म्हस्के यांनी काय म्हटलं?

शपथपत्र का घेतली होती?

खरी शिवसेना आपणच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शपथपत्र घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. ही शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली जाणार आहे. शिवसेना पक्षाचं नाव, तसंच शिवसेनेचं चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या गोठवण्यात आलं होतं. अशातच आता या बनावट शपथपत्र घोटाळाप्रकरणानं राजकारण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.

तपास सुरु

क्राईम ब्रांच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जी शपथपत्र आढळली आहे, त्यावर आधारकार्ड आणि शिवसैनिकांचा फोटोदेखील आहे. या सर्वांना बोलून पडताळणी केली जाईल. ही शपथपत्र त्यांच्या संमतीनेच घेतली गेली आहेत का, याची आता सखोल चौकशी निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या क्राईम ब्रांच पथकाकडून केली जाणार आहे.

मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.