AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur by election : भारत भालकेंच्या जागी कोण? पंढरपुरात तिरंगी लढतीची चिन्हं

भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Pandharpur by election : भारत भालकेंच्या जागी कोण? पंढरपुरात तिरंगी लढतीची चिन्हं
Sadhana Bhosale Pandharpur_Jayashree Bhalke Pandharpur_Shaila Godse
| Updated on: Mar 18, 2021 | 5:05 PM
Share

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात 17 एप्रिलला इथे मतदान तर 2 मे रोजी निकाल लागणार आहे. महाविकास आघाडीपासून ते भाजपपर्यंत उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीकडून महिला चेहरा दिल्यास, भाजपकडून महिला चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. (Pandharpur Assembly by election 2021)

दुसरीकडे आमदार प्रशांत परिचारक यांनी सध्या तरी शांत बसण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांच्या गटाच्या नगराध्यक्ष साधना भोसले किंवा त्यांचे पती नागेश भोसले यांचे नाव ते पुढे करु शकतात.

कुणाकुणाची नावं चर्चेत?

शिवसेनेचे नेत्या शैला गोडसे यांनी भाजपाशी जवळीक साधत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आता भाजपामधून उमेदवारी मिळण्याची तयारी केली आहे. तर दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

भालके कुटुंबाबाबत सहानुभूतीची लाट

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी जोर देत आहेत.

तर भाजपकडूनही महिला उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभेसाठी जयश्री भालके यांचे नाव पुढे आले तर भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे.त्यामुळे परिचारक गटाच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. नगराध्यक्षपद मिळण्याच्या आदीपासूनच त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे पती नागेश भोसले हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. शिवाय ते उद्योगपती असल्याने त्यांचं या मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे.

यातच शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी गेल्या अनेक महिन्यापासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. शैला गोडसे सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या उमेदवारीचा विचार होण्याची शक्यता आहे. शैलजा गोडसे यांना ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत राजकीय अनुभव आहे. त्यांनी 2014 मध्ये पदवीधर विधानपरिषद अपक्ष निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र त्याना संधी मिळाली नसल्याने शिवसेनेवर त्या नाराजच होत्या. त्यामुळे आता भाजपा साधना भोसले यांच्या नावाचा विचार करणार की शिवसेनेतून भाजपात येत असलेल्या शैला गोडसे यांच्या नावाचा विचार करणार हे आता लवकरच समजेल.

समाधान आवताडेंची फिल्डिंग

तिकडे दामाजी चेअरमन समाधान आवताडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. दोन्ही पक्षाकडून त्यांचं नाव चर्चेत आहे. मात्र महिला उमेदवार दिला तर समाधान आवताडे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातील भरघोस अशी मते मिळाली होती. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये तिरंगी लढतीचे वारे वाहत आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम –

> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

भारत भालके यांचं निधन

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

संबंधित बातम्या   

Pandharpur Assembly by-election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.