नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे 1000 % एकत्र येणार; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं सर्वात मोठं विधान

Shahajibapu Patil on Uddhav Thackeray Narendra Modi and Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे 1000 % एकत्र येणार! कुणी केलं हे वक्तव्य? नेमकं शिंदे गटाच्या या नेत्यानं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे 1000 % एकत्र येणार; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं सर्वात मोठं विधान
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 12:17 PM

रवी लव्हेकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पंढरपूर, | 06 मार्च 2024 : 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणितं बदलली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासूनच ही अनैसर्गिक युती असल्याचा विरोधकांकडून टीका केली जाते. उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील, अशीची चर्चा होत असते. यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. 1 हजार टक्के नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार, माझा अंदाज कधीही चुकणार नाही, असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

मोदी- ठाकरे पुन्हा एकत्र येणार?

एक हजार टक्के नरेंद्र मोदीसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, असा माझा अंदाज आहे. हा अंदाज कधीही चुकणार नसल्याचं वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. तसंच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे निवडणुकीतील सर्व्हे चुकीचे असल्याचं ते म्हणाले. मध्यप्रदेश ,राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हेदेखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असल्याचं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

शहाजीबापू पाटील म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे असतात. मध्यप्रदेश राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचं असतं. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असते, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

विधानसभेला किती जागा जिंकणार?

विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही त्रिमूर्ती 225 च्या वर जागा जिंकणार, असा विश्वास शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला. संजय राऊत हा माणूस महाराष्ट्राचा खलनायक दुर्योधन म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायला लागली आहेत. जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असं वाटत असतं. परंतू तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे आहे. इथून संदिपान भुमरे हेच उमेदवार असतील, असंही शहाजीबापू पाटील म्हणालेत.

Non Stop LIVE Update
महिलांना वर्षाला एक लाख रुपये, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
महिलांना वर्षाला एक लाख रुपये, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.